Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Dahisar To Kashigaon Mumbai Metro: आता अंधेरी ते मिरा भाईंदर, मानखुर्द थेट प्रवास; आजपासून दोन नव्या मार्गिका सुरू, स्थानकं कोणती?

Dahisar To Kashigaon Mumbai Metro: आता अंधेरी ते मिरा भाईंदर, मानखुर्द थेट प्रवास; आजपासून दोन नव्या मार्गिका सुरू, स्थानकं कोणती?

Jagran Marathi 1 month ago

मुंबई. Dahisar To Kashigaon Mumbai Metro line 9: मुंबईकरांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीला दिलासा देणाऱ्या दोन महत्त्वाच्या मेट्रो मार्गिकांचे आज लोकार्पण होत आहे.

मेट्रो 9 ही मुंबई मेट्रो प्रकल्पातील महत्त्वाची लाईन असून ती दहिसर ते काशीगाव दरम्यान धावणार आहे. ही लाईन मेट्रो 7 ला जोडली असल्याने प्रवाशांना आता थेट अंधेरीपर्यंत जाता येणार आहे.

मेट्रो 9 आणि मेट्रो 2 बी चे लोकार्पण

मुंबई मेट्रो अंतर्गत येणाऱ्या मेट्रो-9 आणि मेट्रो-2 बी या मार्गिकांच्या टप्पा १चे उद्घाटन आज पार पडणार आहे.या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित राहणार आहेत.

कोणते टप्पे सुरू होणार?

• मेट्रो 9 (दहिसर - मिरा-भाईंदर)

• टप्पा 1: दहिसर ते काशीगाव

• मिरा-भाईंदर परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपणार

• मेट्रो 2बी (अंधेरी पश्चिम - मंडाले, मानखुर्द)

• टप्पा 1: डायमंड गार्डन ते मंडाले

• पूर्व उपनगरांतील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.

सेवा कधीपासून?

लोकार्पणानंतर उद्यापासून या दोन्ही मार्गिकांवर नियमित प्रवासी सेवा सुरू होणार आहे. त्यामुळे पश्चिम उपनगर, मिरा-भाईंदर आणि पूर्वेकडील मानखुर्द परिसरातील प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होईल.

इतर महत्त्वाचे प्रकल्पही सुरू!

आजच्या कार्यक्रमात आणखी काही मोठ्या पायाभूत प्रकल्पांना गती मिळणार आहे:

• ठाणे-बोरीवली भुयारी मार्ग कामाची अधिकृत सुरुवात

• बीकेसी (BKC) येथे पॉड टॅक्सी प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.

मुंबईकरांना कोणता फायदा मिळणार ?

• प्रवासाचा वेळ लक्षणीय कमी होणार आहे.

• लोकल ट्रेनवरील ताण कमी होणार आहे.

• रस्त्यावरील ट्रॅफिक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

• मिरा-भाईंदर आणि पूर्व उपनगरांचा शहराशी वेगवान संपर्क अधिक जलग गतीने प्रवास सुरू होणार आहे. मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडवणारा हा टप्पा मानला जात आहे. येत्या काळात या मार्गिकांचे पुढील टप्पे पूर्ण झाल्यास शहरातील कनेक्टिव्हिटी आणखी सुधारेल.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Jagran Marathi