Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Durgadi Fort Protest: बकरी ईदनिमित्त दुर्गाडीवर तणाव.. नमाजाला विरोध, ठाकरे-शिंदे गटासह भाजपही आक्रमक, बॅरिकेड्स तोडले, रस्त्यावर आरती

Durgadi Fort Protest: बकरी ईदनिमित्त दुर्गाडीवर तणाव.. नमाजाला विरोध, ठाकरे-शिंदे गटासह भाजपही आक्रमक, बॅरिकेड्स तोडले, रस्त्यावर आरती

Jagran Marathi 2 weeks ago

ठाणे. Kalyan Durgadi Fort controversy: कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावरील धार्मिक वाद बकरी ईदनिमित्त पुन्हा उफाळून आला आहे. कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बकरी ईदच्या दिवशी हिंदू भाविकांना दुर्गाडीवरील मंदिरात प्रवेश बंदी घातली आहे.

त्याचबरोबर बकरी ईद सोडून अन्य दिवशी किल्ला परिसरात कोणत्याही प्रकारच्या इस्लामी उपासनेला मनाई करण्यात आली आहे. आंदोलनात दोन्ही शिवसेना गटांसोबत भाजपचे कार्यकर्तेही सहभागी झाल्याने राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.

प्रशासनाने केलेल्या मंदिर प्रवेश मनाई आदेशाविरोधात गुरुवारी सकाळीच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दुर्गाडी किल्ल्यावर आंदोलन केले. आंदोलकांनी दुर्गाडी किल्ल्यावर जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना अटकाव करत कार्यकर्त्यांची धरपकड केली. पोलिसांनी किल्ला परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करत ठिकठिकाणी बॅरिकेट्सही उभे केले आहेत. आक्रमक आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर हिंदू संघटनांकडून रस्त्यावर आरती करण्यात आली.

दुर्गाडी किल्ल्यावर दुर्गा देवीचं मंदिर, तर पायथ्याशी ईदगाह आहे. किल्ला परिसरात हिंदू, मुस्लिम धर्मांची धार्मिक स्थळे आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या जागेवरून हिंदू आणि मुस्लीम समाजात वाद असून हिंदू संघटनांचा दावा आहे की, येथे मूळ दुर्गा देवीचं मंदिर आहे. तर मुस्लीम समाजबांधव ईदगाह असल्याचा दावा करत असून हा वाद न्यायप्रविष्ट आहे. शिवसेना गेल्या 50 वर्षांपासून यासाठी आंदोलन करत आहे. यंदाच्या आंदोलनात दोन्ही शिवसेनेसह भाजपही सामील झाल्याचे पाहायला मिळालं.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Jagran Marathi