Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Final Result 2026: पाचही राज्यातील निवडणुकीचा अंतिम निकाल; BJP सह कोणत्या पक्षाला कुठे, किती मिळाल्या जागा? वाचा सविस्तर आकडेवारी

Final Result 2026: पाचही राज्यातील निवडणुकीचा अंतिम निकाल; BJP सह कोणत्या पक्षाला कुठे, किती मिळाल्या जागा? वाचा सविस्तर आकडेवारी

Jagran Marathi 1 month ago

डिजिटल डेस्क, नवी दिल्ली. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुदुचेरी इथे विधानसभा निवडणुकांसाठी मतमोजणी झाली आहे. अनेक राज्यातील अंतिम निकाल आले आहेत. तर काही राज्यातील निकाल येणे बाकी आहेत.

रात्री 10:10 वाजता हाती आलेल्या आकडेवारी नुसार, आसाम, पुदुचेरी बंगालमध्ये भाजप (BJP) सरकार स्थापन होणार आहे. केरळमध्ये काँग्रेसची (Congress) सत्ता आली आहे. तर तामिळनाडूमध्ये अभिनेता विजयचा पक्ष, टीव्हीके (TVK) जोरदार कामगिरी केली आहे.

पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार (Who wins in West Bengal)

निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार, बंगालमध्ये भाजप पहिल्यांदाच सरकार स्थापन करु शकते. भाजपाने 206 जागांवर विजय मिळवला आहे. दरम्यान, बंगालमध्ये टीएमसीला मोठा धक्का बसला असून, त्यांना 81 जागांवर विजय मिळाला आहे. त्यांची संख्या दुहेरी अंकातच मर्यादित राहिली आहे.

आसाममध्ये भाजपाचा एकतर्फी विजय (Assam Election Result 2026)

निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आसाममध्ये 126 जागांपैकी भाजपाने 82 जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसला केवळ 19 जागांवर विजय मिळवता आला आहे.

TVK ने तामिळनाडूमध्ये दिला आश्चर्याचा धक्का (Tamil Nadu Election Result 2026)

निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार, तामिळनाडूमध्ये अभिनेता विजयचा पक्ष, टीव्हीके (TVK) जोरदार कामगिरी करत आहे. त्यांनी 108 जांगावर विजय मिळवला आहे. तर सत्ताधारी डीएमकेने 59 जागांवर विजय मिळवला आहे.

सविस्तर वाचा - तामिळनाडूत विजय 'किंग' आता किंगमेकर कोण बनणार? सरकार स्थापनेसाठी 10 आमदारांची आवश्यकता; समजून घ्या समीकरण

केरळमध्ये काँग्रेसची सत्ता (Kerala Election Result 2026)

निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार, केरळममध्ये सर्व 140 जागांचे निकाल लागले आहेत. येथे काँग्रेसने बाजी मारली आहे. काँग्रेसने सर्वाधिक 63 जागांवर विजय मिळला आहे. CPI(M) पक्षाला 26 जागा मिळला आहेत.

पुदुचेरीमध्ये भाजपा सरकार (Puducherry Election Result 2026)

निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार, पुदुचेरीमधील 30 जागांवर मतमोजणी झाली आहे. एआयएनआरसीने सर्वाधिक 12 जागांवर विजय मिळवला आहे.

हेही वाचा - PM Modi Speech: भाजपाने बंगाल जिंकले! पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेणार हा निर्णय; मोदींनी थेटच सांगितलं…!

हेही वाचा- Bengal Election Result: भवानीपूर मतदारसंघात पेटला संघर्ष, ममता बॅनर्जींचा मारहाण केल्याचा आरोप, Video

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Jagran Marathi