जेएनएन, मुंबई. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे इ.12 वी परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2026 च्या निकालाबाबत एक निवेदन दिले आहे. त्यानुसार यंदा बारावीचा निकाल (Maharashtra Board 12th Result 2026) अधिकृत संकेतस्थळांवर शनिवार दिनांक 2 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.
बारावीचा निकाल कधी लागणार
निवेदनानुसार, 'महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर शनिवार दिनांक 2 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.' असे त्यांनी म्हटलं आहे.
2026 च्या बारावीच्या निकालाची वेळ (Class 12 Result on 2 May)
12 वी (When HSC result Declared) : 2 मे 2026 चा रोजी दुपारी 1 वाजता.
बारावीचा निकाल कसा पाहायचा (How to Check the 12th Results)
- महाराष्ट्र बोर्ड इयत्ता बारावीचा निकाल तपासण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला https://mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
- तुम्हाला वेबसाइटच्या होम पेजवरील रिझल्ट लिंकवर क्लिक करावे लागेल.
- आता तुम्हाला रोल नंबर आणि आईचे पहिले नाव टाकून 'निकाल पहा' बटणावर क्लिक करावे लागेल.
- यानंतर स्क्रीनवर निकाल दिसेल, जिथून तुम्ही तो तपासू शकाल तसेच गुणपत्रिकेची डिजिटल प्रत डाउनलोड करू शकाल.
दहावी - बारावीची परीक्षा कधी झाल्या?
2025-26 च्या शैक्षणिक वर्षातील बारावीची परीक्षा 10 फेब्रुवारी ते 11 मार्च 2026 या कालावधीत झाली, तर दहावीची परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 पर्यंत घेण्यात आली.
कसा पाहायचा निकाल? (How to Check the 12th Results)
- निकाल जाहीर झाल्यावर तो https://results.digilocker.gov.in किंवा https://mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइट्सवर सहज पाहता येईल.
- विद्यार्थ्यांना फक्त आपला सीट नंबर आणि आईचे नाव टाकावे लागेल.
- त्यानंतर त्यांना त्यांचा निकाल वेबसाईटवर दिसेल.
- विद्यार्थांनी त्याची एक प्रत काढून घ्यावी किंवा निकाल सेव्ह करून ठेवावा.
- बोर्डाच्या mahahsscboard.in या साइटवरही माहिती मिळू शकणार आहे.
कोणत्या वेबसाईटवर निकाल जाहीर होणार
- 1. https://results.digilocker.gov.in
- 2. https://mahahsscboard.in
- DigiLocker
हेही वाचा - Maharashtra Board 12th Result 2026: बारावीच्या निकालाची प्रतीक्षा संपली, 2 मे रोजी दुपारी 1 वाजता निकाल होणार जाहीर

