Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Manoj Jarange Patil: आता आर-पारची लढाई! उष्माघाताने मेलो तर मुख्यमंत्री जबाबदार; रखरखत्या उन्हात उपोषण, चप्पलही नाही, जरांगेंचा इशारा

Manoj Jarange Patil: आता आर-पारची लढाई! उष्माघाताने मेलो तर मुख्यमंत्री जबाबदार; रखरखत्या उन्हात उपोषण, चप्पलही नाही, जरांगेंचा इशारा

Jagran Marathi 4 months ago

जालना - मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला अल्टीमेटम उद्या संपत असून ३० मेपासून आमरण उपोषण पुन्हा सुरू करणार असल्याचा निर्वाणीचा इशारा सरकारला दिला आहे. जरांगे यांनी मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी आरपारच्या लढाईची घोषणा केली आहे.

दरवेळचं उपोषण सावलीत होते मात्र यावेळचं उपोषण अत्यंत कठोर होणार आहे. देशात असं उपोषण झालं नसेल असं उपोषण करणार आहे. मंडप टाकणार नाही. सावलीत बसणार नाही. थेट रणरणत्या उन्हात बसणार आहे. मी उष्माघाताने मेलो तर त्याला सरकारच जबाबदार असेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असीतल, असा इशाराच जरांगे यांनी दिला आहे.त्यामुळे राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज (28 मे) अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मराठा समाजाच्या हक्कांसाठी शेवटपर्यंत संघर्ष सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी म्हटले. समाजाच्या मागण्या पूर्ण न झाल्यास शनिवार 30 मे पासून पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे.

बाज टाकून रखरखत्या उन्हात बसणार -

जरांगे पाटील म्हणाले की, माझ्या समाजातील लेकरांच्या आयुष्याचा उन्हाळा झालाय, तर मी माझी कदर का करू?, अआता केवळ चर्चा नको तर थेट अंमलबजावणी हवी अशी ठाम भूमिका घेतली आहे. जरांगे यांनी आपल्या आंदोलनाचे स्वरूप बदलल्याचे जाहीर केले. त्यांनी म्हटले की, सरकारला 10 महिने वेळ दिला. आता माझा नाईलाज आहे, मला कोणाला दोष द्यायचा नाही, आपल्या लेकरांना, समाजाला मिळत नसेल तर आपण कठोर भूमिका घेणं गरजेचं आहे.

30 मे रोजी सुरू होणारं आमरण उपोषण आतापर्यंतच सर्वात वेगळं असणार आहे. नेहमीची उपोषणे ही सावलीत, मंडपात किंवा फॅनखाली केली जातात. पण मला आता अंतिम आणि टोकाचे उपोषण करायचे आहे. मे महिन्याच्या या रखरखत्या उन्हात एक साधी बाज टाकून उघड्यावर बसणार आहे. यात ना कुठले अन्न असेल, ना पाणी आणि मी पायात चप्पलही घालणार नाही, असे जरांगे पाटील म्हणाले.

उष्माघाताने मेलो तर मुख्यमंत्री जबाबदार -

तीन वर्षांपासून आंदोलन सुरू असताना सरकार चर्चेसाठी सतत वेळ मागत आहे. आता थांबता येणार नाही. उष्माघाताने बळी गेला तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संपूर्ण सरकार जबाबदार राहील, असा इशारा त्यांनी दिला.

कुणबी मराठा मंत्रालय स्थापन करा- मनोज जरांगे

माझ्या समाजाच्या लेकरांचा उन्हाळा होतोय, ते कुठेतरी थांबलं पाहिजे. आमरण उपोषण सुरू असताना मराठा समाजानं अंतरवाली सराटीकडे येऊ नये, असंही मनोज जरांगे यांनी आवाहन केलं आहे. प्रसाद लाड, राधाकृष्ण विखे पाटील हे येणार की नाही हे मला माहिती नाही. 29 ऑगस्ट पासून उद्या पर्यंत सरकारला 10 महिन्याचा वेळ दिला आहे. हैदराबाद गॅझेटिअरचा जीआर काढला त्यानुसार तुम्ही प्रमाणपत्र देणार आहात का? व्हॅलिडिटी देणार आहात का? हे सरकारनं एकदा स्पष्ट करावं. सातारा गॅझेटिअर लागू करण्यासाठी एक महिन्याचा वेळ मागितलेला, 10 महिने जीआर काढत नाहीत, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली. मराठा कुणबी मंत्रालय स्थापन का करत नाही, असा सवालही जरांगे यांनी केला.

हे ही वाचा -मराठा उपसमिती बरखास्त करा, स्वतंत्र कुणबी आणि मराठा मंत्रालय स्थापन करा; मनोज जरांगेंच्या सरकारसमोर 10 प्रमुख मागण्या

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Jagran Marathi