Dailyhunt
Nashik TCS Case: आरोपींकडून मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर जप्त; आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता

Nashik TCS Case: आरोपींकडून मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर जप्त; आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता

Jagran Marathi 2 weeks ago

नाशिक. Nashik TCS Case: धर्मांतर आणि कथित लैंगिक शोषण प्रकरणात पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. आरोपींकडून महत्त्वाचे डिजिटल पुरावे जप्त केले आहेत. या कारवाईत मोबाईल फोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर जप्त करण्यात आले असून त्यामधून धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या मोबाईल फोनमध्ये धर्मांतरासंबंधित फोटो आणि व्हिडिओ आढळून आले आहेत. तसेच काही संभाषणांचे रेकॉर्ड, सोशल मीडियावरील चॅट्स आणि अन्य डिजिटल डेटा तपासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. या सर्व सामग्रीचा फॉरेन्सिक तपास केला जाणार असून, त्यातून आणखी काही संशयितांची नावे पुढे येऊ शकतात.

या प्रकरणातील संशयित आरोपींची सध्या कसून चौकशी सुरू आहे. धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आला का, कोणत्या पद्धतीने संपर्क साधला गेला, तसेच लैंगिक शोषणाच्या आरोपांमागील नेमकी परिस्थिती काय होती, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

दरम्यान, या प्रकरणामुळे नाशिक शहरात मोठी खळबळ उडाली असून विविध सामाजिक संघटनांनीही या घटनेची दखल घेत कठोर कारवाईची मागणी केली आहे. पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि दोषींवर कडक कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

तपास यंत्रणांकडून मिळालेल्या डिजिटल पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येणार असून, या प्रकरणात आणखी धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Jagran Marathi