Dailyhunt
Nashik TCS Case मध्ये मोठा खुलासा; निदा खानच्या भूमिकेवर कोर्टाचे गंभीर निरीक्षण, 'आंतरराष्ट्रीय कनेक्शन'चा तपास सुरू

Nashik TCS Case मध्ये मोठा खुलासा; निदा खानच्या भूमिकेवर कोर्टाचे गंभीर निरीक्षण, 'आंतरराष्ट्रीय कनेक्शन'चा तपास सुरू

Jagran Marathi 5 days ago

जेएनएन, नाशिक. नाशिकच्या टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस (टीसीएस) कार्यालयातील लैंगिक अत्याचार, विनयभंग आणि कथित धर्मांतर प्रकरणाने आता अधिक गंभीर वळण घेतले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या निदा खान हिचा अटकपूर्व जामीन नाशिक सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर तपास यंत्रणांना मोठा धागा मिळाला आहे.

न्यायालयाने या प्रकरणाला "मल्टिडायमेन्शनल आणि संघटित कटाचा भाग" असे म्हटले असून, तपासात काही धक्कादायक बाबी समोर आल्याचे सांगितले जात आहे.

तपासात नेमकं काय आढळलं?

  • 'ब्रेनवॉशिंग'चा आरोप

न्यायालयाच्या निरीक्षणानुसार, पीडितेला धार्मिक पद्धती शिकवणे, बुरखा देणे, नमाजाचे प्रशिक्षण देणे आणि हिंदू धर्माविषयी आक्षेपार्ह माहिती देऊन मानसिकदृष्ट्या प्रभावित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हे सर्व एका नियोजनबद्ध पद्धतीने झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

  • मलेशिया कनेक्शन समोर!

तपासादरम्यान पीडितेचे नाव बदलून तिला मलेशियाला पाठवण्याचा प्रयत्न झाल्याचा उल्लेख न्यायालयीन आदेशात करण्यात आला आहे. यामुळे या प्रकरणाला आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे धागेदोरे असल्याचा संशय बळावला आहे. पोलिस या संदर्भातील डिजिटल पुरावे, कॉल रेकॉर्ड्स आणि आर्थिक व्यवहार तपासत आहेत.

मेलगाव नेटवर्कची चौकशी!

नाव बदलण्यासाठी आणि पुढील प्रक्रिया राबवण्यासाठी काही स्थानिक नेटवर्कचा वापर झाल्याची शक्यता तपासली जात आहे. तपासात काही शहरांची आणि परदेशातील संपर्कांची नावे समोर आल्याची माहिती न्यायालयाने नोंदवली आहे. 

अनेक FIR, अनेक आरोपी

या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत नऊ FIR दाखल झाल्या असून अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर लैंगिक छळ, विनयभंग, धार्मिक भावना दुखावणे आणि जबरदस्ती धर्मांतराचा प्रयत्न अशा गंभीर आरोपांखाली गुन्हे दाखल आहेत.

निदा खानची भूमिका काय?

पोलीस तपासानुसार, निदा खान ही कथितपणे या संपूर्ण नेटवर्कमधील महत्त्वाची समन्वयक होती. पीडितेशी सतत संपर्क ठेवणे, धार्मिक प्रशिक्षण देणे आणि इतर आरोपींशी समन्वय साधणे, असा तिच्यावर आरोप आहे. कोर्टाने स्पष्ट शब्दांत म्हटले आहे की "तिची कोठडीतील चौकशी अत्यावश्यक आहे." सध्या विशेष तपास पथक (SIT) डिजिटल फॉरेन्सिक तपास, आर्थिक व्यवहार आणि संभाव्य परदेशी संपर्कांची चौकशी करत आहे. निदा खानच्या अटकेनंतर या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, टाटा कन्सल्टन्सी सर्विसेसने या प्रकरणात शून्य सहनशीलतेची भूमिका घेत संबंधित कर्मचाऱ्यांना निलंबित करून तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे सांगितले आहे.

हेही वाचा - Maharashtra Cabinet Decision: राज्य मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकार घेतले 3 मोठे निर्णय

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Jagran Marathi