Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पोटनिवडणुकींची चुरस वाढली; राहुरीत वंचितकडून अनिल जाधव यांना उमेदवारी

पोटनिवडणुकींची चुरस वाढली; राहुरीत वंचितकडून अनिल जाधव यांना उमेदवारी

Jagran Marathi 1 month ago

जेएनएन, अहिल्यानगर: राहुरी विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी अहिल्यानगर जिल्हा कार्यकारिणीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अहिल्यानगर दक्षिण व उत्तर जिल्ह्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली.

यावेळी अनिल भिकाजी जाधव या आदिवासी तरुण कार्यकर्त्याला उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

कोण आहेत अनिल जाधव

या बैठकीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी एकमुखाने हा निर्णय घेतला. अनिल जाधव हे गोरगरीब, कष्टकरी आणि शोषित घटकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा देणारे, तडफदार व अनुभवी कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना विधानसभेत पाठवण्यासाठी उमेदवारी देण्यात आल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले.

याबाबत माहिती देताना राज्य प्रवक्ते ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी सांगितले की, "आजपर्यंत या मतदारसंघात प्रस्थापितांना उमेदवारी देण्याची परंपरा राहिली आहे. मात्र संविधान जिवंत ठेवण्यासाठी आणि जातीवादी मानसिकतेला पराभूत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने एका संघर्षशील कार्यकर्त्याला संधी दिली आहे."

तसेच, मतदारसंघातील जनतेने एकदिलाने काम करून अनिल जाधव यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

दरम्यान, या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात नवी समीकरणे तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा - नाशिक पुन्हा हादरले! खंडणी प्रकरणाच्या चौकशीत सापडले 121 अश्लील Video; लैंगिक शोषणाप्रकरणी आरोपीला अटक

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Jagran Marathi