Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
राष्ट्रवादी (शरद पवार गट) ला मोठा धक्का; प्राजक्त तनपुरे आज भाजपमध्ये प्रवेश करणार?

राष्ट्रवादी (शरद पवार गट) ला मोठा धक्का; प्राजक्त तनपुरे आज भाजपमध्ये प्रवेश करणार?

Jagran Marathi 1 week ago

जेएनएन, मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रभावी नेतृत्व म्हणून ओळख असलेले तनपुरे हे शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जात होते. त्यामुळे त्यांच्या संभाव्य पक्षांतरामुळे राष्ट्रवादी (शरद पवार गट) ला मोठा राजकीय धक्का बसणार असल्याचे मानले जात आहे.

विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचाली
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीसाठी त्यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

माहितीनुसार, राहुरी पोटनिवडणुकीवेळी तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर महायुतीतील काही वरिष्ठ नेत्यांशी त्यांचा संपर्क वाढला होता. त्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना अधिक वेग आला.

शरद पवार गटासाठी धक्का
अहिल्यानगर जिल्ह्यात राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे संघटन मजबूत करण्यात तनपुरे यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. जिल्ह्यातील सहकार, साखर कारखाने आणि स्थानिक राजकारणात त्यांचा प्रभाव असल्याने त्यांच्या जाण्यामुळे पक्षाच्या संघटनात्मक ताकदीवर परिणाम होणार आहे.

भाजपची ताकद वाढणार?
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर राज्यात विविध पक्षांतील नेत्यांचे पक्षांतर सुरू असताना तनपुरे यांचा संभाव्य भाजप प्रवेश हा महायुतीसाठी मोठा राजकीय फायदा मानला जात आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात भाजपचे राजकीय समीकरण अधिक मजबूत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आजपासून आमरण उपोषणावर; सरकारशी चर्चा निष्फळ

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Jagran Marathi