जेएनएन, मुंबई: उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षातील पदाधिकाऱ्यांना थेट इशारा देत धडकी भरवली आहे. "काम नाही तर पदही नाही!"
शिंदेंचा इशारा: "निष्क्रियांना थेट नारळ" शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या ऑनलाईन बैठकीत शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना खडसावलेच नाही, तर स्पष्ट शब्दांत सांगितले की कामाचा रिपोर्ट नाही?
मग पदावर बसण्याचा अधिकार नाही.
पक्षात केवळ पद मिरवणाऱ्यांना आता थेट बाहेरचा रस्ता दाखवला जाणार, असा इशाराच शिंदे यांनी दिला.
"प्रत्येक हालचाल माझ्या नजरेत"
शिंदे यांनी संघटनेवर कडक नियंत्रण ठेवण्याचा निर्धार करत अनेक आदेश दिले!
• प्रत्येक बैठकीचे फोटो पाठवा
• रोजचा कामाचा अहवाल द्या
• प्रत्येक विधानसभेची स्वतंत्र बैठक घ्या. "मी स्वतः सगळं पाहणार!"या एका वाक्यातच शिंदेंचा आक्रमक अंदाज स्पष्ट झाला.
"पद विसरा, कार्यकर्ता बना!"
मंत्री, आमदार, खासदार कोणालाही सूट नाही!"सगळ्यांनी कार्यकर्त्यांसारखं रस्त्यावर उतरून काम करा" असा थेट आदेश शिंदेंनी दिला.यामुळे पक्षातील मोठ्या नेत्यांनाही आता मैदानात उतरावं लागणार आहे.
पुण्यात मोठा धक्का - पूर्ण कार्यकारिणी बरखास्त
पुण्यात शिवसेनेची संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करून शिंदेंनी थेट अॅक्शन घेतली आहे.या निर्णयाने राज्यभरातील पदाधिकाऱ्यांसाठी रेड सिग्नल दिला आहे.
"भाकरी फिरणार"
एकनाथ शिंदे यांनी निष्क्रिय पदाधिकाऱ्यांची गच्छंती करण्याचा निर्णय घेतला आहे.दरम्यान नव्या चेहऱ्यांना मोठी संधी मिळणार असल्याचे संकेत ही शिंदे यांनी दिले आहे. पक्ष संघटनेत मोठे बदल अटळ असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा: Baramati By Election: बारामती पोटनिवडणुकीत 55 उमेदवार रिंगणात, सुनेत्रा पवारांनी घेतली फडणवीसांची भेट

