Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
ब्रेकिंग ! जळगाव जिल्ह्याला भूकंपाचा सौम्य धक्का

ब्रेकिंग ! जळगाव जिल्ह्याला भूकंपाचा सौम्य धक्का

ळगाव लाईव्ह न्यूज । १ सप्टेंबर २०२६ । जळगाव जिल्ह्यातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जिल्ह्यात आज (1 सप्टेंबर) पहाटे ७ वाजून ५७ मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का बसल्याची नोंद दिल्ली येथील राष्ट्रीय भूकंप नोंद केंद्रावर झाली आहे.

जळगाव जिल्ह्यातील रावेर परिसरात हा भूकंपाचा धक्का बसल्याचे स्पष्ट झाले आहे. धक्का अतिशय सौम्य स्वरूपाचा असल्याने जळगाव जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांना त्याची जाणीव झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

दिल्ली येथील केंद्रावर नोंद झाल्याचा दुजोरा जळगाव येथील आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिला आहे. भूकंपाची तीव्रता कमी असल्याने सध्या कोणतीही जीवित किंवा मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Jalgaon Live