Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहाला उत्साहात प्रारंभ

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहाला उत्साहात प्रारंभ

ळगाव लाईव्ह न्यूज । डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या प्रसूती व स्त्रीरोग विभागात १ ते ७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत साजर्‍या होणार्‍या जागतिक स्तनपान सप्ताहाला उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला.

या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. उल्हास पाटील,विभागप्रमुख डॉ. माया अर्वीकर, डॉ. वैभव पाटील, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ.तेजस सोनवणे,डॉ.मृदूला मुंगसे, डॉ. रश्मी संघवी,डॉ.प्राजक्ता पाटील,डॉ. साक्षी पटवारी, डॉ. संस्कृती भिरूड, डॉ. सिध्दी संके, पूजा गजरे, प्रतिक्षा जुमडे यांचेसह विभागातील प्राध्यापक, निवासी डॉक्टरांची प्रमुख उपस्थिती होती.स्तनपानाचे महत्त्व, माता व बालकांच्या आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम आणि स्तनपानाबाबत समाजात जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

उद्घाटनप्रसंगी मान्यवरांनी स्तनपान हे बालकाच्या उत्तम शारीरिक व मानसिक विकासासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. नवजात बालकाला जन्मानंतरच्या पहिल्या तासात स्तनपान देणे तसेच पहिल्या सहा महिन्यांपर्यंत केवळ स्तनपानावर भर देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.सप्ताहादरम्यान विविध जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये गर्भवती व स्तनदा मातांसाठी समुपदेशन सत्रे, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, पोस्टर सादरीकरण, आरोग्य शिक्षण कार्यक्रम, प्रश्नोत्तर सत्रे तसेच स्तनपानाबाबत जागरूकता निर्माण करणारे उपक्रम राबविण्यात येत आहेत. रुग्णालयात दाखल असलेल्या माता व त्यांच्या कुटुंबीयांनाही स्तनपानाचे फायदे आणि योग्य पद्धतींबाबत माहिती देण्यात येत आहे.

यावेळी डॉ. उल्हास पाटील यांनी स्तनपान ही बालकासाठी निसर्गाने दिलेली सर्वोत्तम भेट असून प्रत्येक आईने त्याचे महत्त्व समजून घेतले पाहिजे, असे सांगितले. प्रा. डॉ. माया अर्वीकर यांनी माता आणि बालकांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी स्तनपानाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमूद केले.जागतिक स्तनपान सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांमुळे माता, कुटुंबीय आणि समाजामध्ये स्तनपानाबाबत सकारात्मक जागरूकता निर्माण होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Jalgaon Live