Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
जळगावात आज विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज

जळगावात आज विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज

जळगाव लाईव्ह न्यूज । मागच्या काही दिवसापासून जळगाव शहरासह जिल्ह्यात दिवसा 'ऑक्टोबर हिट'चा तडाखा कायम असताना रात्री आणि पहाटे हवेत गारवा जाणवत आहे. अशातच आज जळगावात बुधवारी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

यादरम्यान आकाश अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज असून, त्यानंतर पुन्हा तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

सकाळी गारवा, दुपारी उन्हाचा चटका

मंगळवारी सकाळी नोंदवलेल्या हवामान अहवालानुसार, जळगावचे किमान तापमान १८.२ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. हे तापमान सरासरीपेक्षा ०.२ अंशांनी कमी असल्याने पहाटेच्या वेळी हवेत सुखद गारवा जाणवत आहे. सकाळी हवेतील आर्द्रता ६० टक्के नोंदवण्यात आली. दुसरीकडे, दुपारच्या वेळी उन्हाचा चटका कायम असून कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे.

बुधवारी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

शहर आणि जिल्ह्यात बुधवारी वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे. मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळू शकतात. त्यामुळे नागरिकांना काही काळ उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

बुधवारच्या संभाव्य पावसानंतर गुरुवार, २२ ऑक्टोबरपासून पुढील आठवडाभर आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे कमाल तापमानात पुन्हा वाढ होऊ शकते. दिवसाचे तापमान ३८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. दिवसा तापमान वाढत असतानाच रात्रीच्या तापमानात घट होण्याचा अंदाज आहे. २४ आणि २५ ऑक्टोबरदरम्यान किमान तापमान १७ अंश सेल्सिअसपर्यंत खाली येऊ शकते. त्यामुळे दिवसा कडक ऊन आणि रात्री गारवा असे दुहेरी हवामान जळगावकरांना अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे.

एकूणच, बुधवारी संभाव्य पाऊस आणि त्यानंतर पुन्हा वाढणारे तापमान यामुळे जळगावच्या हवामानात चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Jalgaon Live