Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
जळगावात मंदिरातील दानपेटी चोरीचा पर्दाफाश; संशयितासह बालक ताब्यात

जळगावात मंदिरातील दानपेटी चोरीचा पर्दाफाश; संशयितासह बालक ताब्यात

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील योगेश्वर नगर परिसरातील गजानन पार्क येथील नर्मदेश्वर महादेव मंदिरातील दानपेटी चोरीला गेल्याची घटना २७ सप्टेंबर रोजी घडली होती. या प्रकरणाचा शनिपेठ पोलिसांनी तात्काळ तपास करत अवघ्या काही वेळात छडा लावला असून, एका संशयित आरोपीसह एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेत चोरीस गेलेली १२ हजार ५५० रुपयांची रोकड हस्तगत केली आहे.

याबाबत योगेश्वर देविदास पाटील, रा. योगेश्वर नगर, जळगाव यांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरून शनिपेठ पोलीस ठाण्यात गुरनं. २०४/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांना गुन्ह्याचा सखोल तपास करून आरोपींचा शोध घेण्याच्या तसेच चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्याच्या सूचना दिल्या.

त्यानुसार गुन्हे शोध पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर पोलिसांची गोपनीय यंत्रणाही सक्रिय करण्यात आली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे चंद्रकांत भागवक पाटील, रा. दशरथ नगर, जळगाव तसेच एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी दोघांची चौकशी केली असता त्यांनी नर्मदेश्वर महादेव मंदिरातील दानपेटीतील रक्कम चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या ताब्यातून १२ हजार ५५० रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ. अनिल सांळुखे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांच्या नेतृत्वात करण्यात आली. पथकात संतोष खेडकर, अभिषेक कटारे, विजय खैरे, योगेश जाधव, अनिल सांळुखे, पराग दुसाने, अमोल वंजारी, निलेश घुगे, गणेश ढाकणे, योगेश साबळे, नवजित चौधरी तसेच सीसीटीव्ही फुटेज विश्लेषक मुबारक देशमुख यांचा समावेश होता.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Jalgaon Live