Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
खरेदीची सुवर्णसंधी ! ५ दिवसांत चांदी १२ हजारांनी तर सोने ४ हजारांनी स्वस्त, आता नवीन दर काय?

खरेदीची सुवर्णसंधी ! ५ दिवसांत चांदी १२ हजारांनी तर सोने ४ हजारांनी स्वस्त, आता नवीन दर काय?

ळगाव लाईव्ह न्यूज । २८ मे २०२६ । आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडीमुळे देशांतर्गत सराफ बाजारात सोने आणि चांदी दरात चढ उतार पाहायला मिळत आहे. कधी भाव वाढत आहे तर कधी घसरण होत आहे. दरम्यान सध्या ग्राहकांना दिलासा देणारी बातमी आहे.

सोने-चांदीच्या दरातील घसरणीचा सिलसिला कायम असून आज सराफा बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली. सोन्याच्या दरात तब्बल २ हजार रुपयांची घसरण झाली असून चांदीचे दर तब्बल ४ हजार रुपयांनी कोसळले आहेत. गेल्या पाच दिवसांत सोन्याचे दर सुमारे ४ हजार रुपयांनी तर चांदीचे दर तब्बल १२ हजार रुपयांनी कमी झाल्याने गुंतवणूकदार आणि ग्राहकांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे.

सराफा व्यावसायिकांच्या मते, अमेरिका आणि इराण यांच्यात वाढत्या तणावामुळे जागतिक बाजारपेठेत अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन डॉलर मजबूत झाल्याने सोन्या-चांदीतील गुंतवणूक कमी झाली आणि त्याचा थेट परिणाम किमतींवर झाला आहे.

आज भारतात २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम १५ हजार ६०६ रुपये नोंदवण्यात आला असून तो कालच्या तुलनेत २३८ रुपयांनी कमी आहे. २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम १४ हजार ३०५ रुपये तर १८ कॅरेट सोन्याचा दर ११ हजार ७०४ रुपयांवर आला आहे. दुसरीकडे चांदीचा भाव प्रति ग्रॅम २७५ रुपये असून प्रति किलो चांदी २ लाख ७५ हजार रुपयांवर पोहोचली आहे. एका दिवसात चांदीच्या दरात तब्बल १० हजार रुपयांची घसरण झाल्याचे दिसून आले.

दरम्यान, बकरीद निमित्त मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) चे पहिले सत्र बंद होते. जागतिक बाजारातही सोन्या-चांदीच्या दरावर दबाव कायम असून स्पॉट गोल्ड आणि स्पॉट सिल्व्हरच्या किमतीत घसरण नोंदवण्यात आली आहे. सराफा बाजारातील तज्ज्ञांच्या मते, पुढील काही दिवस जागतिक घडामोडींवर सोन्या-चांदीच्या किमतींची दिशा अवलंबून राहणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Jalgaon Live