Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
खरेदीची सुवर्णसंधी! सोन्याचे दर 6000 रुपयांनी घसरले; चांदीचे दर स्थिर, पाहा ताजे भाव

खरेदीची सुवर्णसंधी! सोन्याचे दर 6000 रुपयांनी घसरले; चांदीचे दर स्थिर, पाहा ताजे भाव

ळगाव लाईव्ह न्यूज । ३० मे २०२६ । सोनं-चांदी खरेदी करण्याची इच्छा असलेल्या ग्राहकांसाठी आज अत्यंत आनंदाची बातमी आहे. आज सकाळी सराफ बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे, तर चांदीचे दर मात्र स्थिर आहेत.

२४ कॅरेट सोन्याचे दर तब्बल ६,००० रुपयांनी (प्रति १० तोळे) स्वस्त झाल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तुम्हीही आज सोने खरेदीचा विचार करत असाल, तर १८, २२ आणि २४ कॅरेट सोन्याचे आजचे ताजे भाव नक्की जाणून घ्या.

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, जळगाव सराफ बाजारात आज सकाळी २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ६०० रुपयांची घसरण झाली. हे सोनं खरेदीसाठी तु्म्हाला १,५७,०४० रुपये खर्च करावे लागतील. तर २४ कॅरेटचे १० तोळा सोनं ६००० रुपयांनी स्वस्त झालं. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १५,७०,४०० रुपये मोजावे लागतील.

दागिन्यांसाठी प्रामुख्याने वापरल्या जाणाऱ्या २२ कॅरेट सोन्याचे दरही लक्षणीयरीत्या घसरले आहेत. २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये आज ५५० रुपयांची घसरण होऊन १,४३,९५० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहे. २४,२२ कॅरेटच्या सोन्यापाठोपाठ १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरामध्ये देखील मोठी घसरण झाली आहे. १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ४५० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १,१७,७८० रुपये खर्च करावे लागतील.

सोन्याच्या दरात मोठी उलथापालट झाली असली तरी चांदीच्या दराने मात्र ग्राहकांना कोणताही झटका दिलेला नाही. आज चांदीचे दर पूर्णपणे स्थिर आहेत. चांदीचा एक किलोचा २,८०,००० रुपये इतका आहे.

दरम्यान, लग्न सराई किंवा सणासुदीच्या काळात सोन्याचे दर अनेकदा कडाडलेले असतात. मात्र, आज सोन्याच्या दरात झालेली ही मोठी घसरण ग्राहकांसाठी एक ‘सुवर्णसंधी’ मानली जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Jalgaon Live