Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
लाडक्या बहिणींसाठी खुशखबर ! जुलैच्या हप्त्याचे पैसे खात्यात येण्यास सुरुवात?

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर ! जुलैच्या हप्त्याचे पैसे खात्यात येण्यास सुरुवात?

ळगाव लाईव्ह न्यूज । मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल मोठी बातमी असून जुलै महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. जुलै महिन्याचा १ हजार ५०० रुपयांचा हप्ता पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

टप्प्याटप्प्याने हा निधी सर्व पात्र महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ‘रक्षाबंधना’च्या पूर्वसंध्येला सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील, असे सांगितले होते. जुलै महिन्याचा हप्ता वेळेत देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाअंतर्गत येणाऱ्या अनुसूचित जाती घटकातील पात्र महिलांसाठी राज्य सरकारने तब्बल ३१९ कोटी ५३ लाख रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग (वितरित) केला आहे. यामुळे संबंधित पात्र महिलांनाही योजनेचा लाभ देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

योजनेच्या पडताळणी प्रक्रियेनंतर राज्यात सध्या सुमारे १ कोटी ६६ लाख महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. पात्र लाभार्थींना दर महिन्याला १ हजार ५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेसाठी दर महिन्याला सुमारे अडीच हजार कोटी रुपयांचा निधी आवश्यक असतो. रक्षाबंधनापूर्वी जुलै महिन्याचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात झाल्याने पात्र महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात राज्यातील लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Jalgaon Live