Dailyhunt
महागाईचा भडका! LPG गॅस सिलिंडर तब्बल ९९३ रुपयांनी महागला, आजपासून नवे दर लागू

महागाईचा भडका! LPG गॅस सिलिंडर तब्बल ९९३ रुपयांनी महागला, आजपासून नवे दर लागू

ळगाव लाईव्ह न्यूज । १ मे २०२६ । नवीन महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा मोठा धक्का बसला आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाचा आणि होर्मुजच्या खाडीतील कोंडीचा थेट फटका आता भारतीय बाजारपेठेला बसू लागला असून सरकारी तेल कंपन्यांनी कमर्शियल एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत तब्बल ९९३ रुपयांची विक्रमी वाढ केली आहे.

१ मे २०२६ पासून हे नवे दर लागू झाले असून, यामुळे व्यावसायिक वर्गाचे कंबरडे मोडले आहे.

सरकारी तेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या दरवाढीनुसार, १९ किलोच्या कमर्शियल सिलिंडरची किंमत आता थेट ३०७१ रुपयांवर पोहोचली आहे. १ एप्रिलपर्यंत या सिलिंडरची किंमत २०७८ रुपये होती. आता तब्बल ९९३ रुपयांची वाढ झाल्याने व्यावसायिक क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे. सुदैवाने, सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या (१४.२ किलो) किमतीत सध्या कोणतीही वाढ केलेली नाही, ज्यामुळे सामान्य गृहिणींना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

हॉटेलमधील खाद्यपदार्थ महागणार?

इराण-अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर एलपीजी गॅसचा जागतिक तुटवडा निर्माण झाला आहे. या दरवाढीचा सर्वात मोठा फटका हॉटेल चालक आणि केटरर्सना बसणार आहे. आधीच अनेक व्यावसायिकांनी गॅस टंचाईमुळे हॉटेल बंद ठेवण्याचा विचार सुरू केला होता, मात्र आता सिलिंडर ३ हजारांच्या पार गेल्याने हॉटेलमधील पदार्थांच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. याचा अंतिम बोजा ग्राहकांच्या खिशावरच पडणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Jalgaon Live