Friday, 24 Sep, 12.08 pm जळगाव LIVE

होम
पॅसेंजर, मेमु लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ सप्टेंबर २०२१ । पाचोरा येथील नागरिक मोठया प्रमाणात जळगाव, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड येथे नोकरी व व्यवसायनिमित्त अप-डाऊन करत असुन पॅसेंजर गाडी बंद असल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. त्यासाठी लवकरात लवकर पेसेंजर, मेमु गाडी सुरू करून त्यांना मासिक पास मिळावा, अशी मागणी भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी सेंट्रल रेल्वेचे महाप्रबंधक अनिलकुमार लाहोटी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

सेंट्रल रेल्वेचे महाप्रबंधक अनिलकुमार लाहोटी यांच्या दौऱ्या दरम्यान त्यांनी दि.२२ रोजी पाचोरा रेल्वे स्थानकाला भेट दिली. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी महाप्रबंधक लाहोटी यांनी मागील काळात पाचोरा स्टेशनवर भारतीय जनता पार्टीने केलेल्या रंगरंगोटी व सौंदर्यीकरणाचे कौतुक करत आभार व्यक्त केले.

अशा आहेत मागण्या
तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी महाप्रबंधक अनिलकुमार लाहोटी यांना, पाचोरा येथील नागरिक मोठया प्रमाणांत जळगाव, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड येथे नोकरी व व्यवसाय निमित्त अप-डाऊन करत असुन पॅसेंजर गाडी बंद असल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.त्यासाठी लवकरात लवकर पेसेंजर/मेमु गाडी सुरू करून त्यांना मासिक पास मिळावा, पाचोरा रेल्वे स्थानकावरून सायंकाळी ६.३० वाजेनंतर नाशिक व मुंबई जाण्यासाठी कुठल्याही गाडीला थांबा नसल्याने गाडी नं. ०२१०६ विदर्भ एक्सप्रेस व गाडी नं. ०२८१० हावडा-मुंबई मेल ह्या गाड्यांना थांबा मिळावा, पाचोरा येथून सुरत, बडोदा,अहमदाबाद येथे जाण्यासाठी एकही गाडीला थांबा नसल्याने गाडी नं. ०६५०१ अहमदाबाद-बेंगलोर (सोलापूर मार्गे) या गाडीला पाचोरा येथे थांबा मिळावा, आदी मागण्यांचे निवेदन दिले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Jalgaon Live
Top