जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑक्टोबर २०२१ । देशातील पेट्रोल- डिझेल आणि गॅसच्या दरवाढीच्या निषेर्धात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे.
पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस, खाद्यतेल इत्यादी जीवन आवश्यक वस्तू केंद्रसरकारच्या चुकीच्या धोरणामुळे वाढत्या महागाईमुळे सामान्य जनतेला जगणे मुश्कील झाले आहे. संदर्भात केंद्र सरकारच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रभर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने दि 20 रोजी तहसीलदार यांना निवेदन दिले. या प्रसंगी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यानी सहभागी झाले होते
यात राष्ट्रवादी युवक कांग्रेस जिल्ह्याअध्यक्ष रवींद्र पाटील, अध्यक्ष ऍड देवकांत बाजीराव पाटील, शहर युवक अध्यक्ष हितेंद्र गजरे, जिल्हा युवक उपाध्यक्ष दीपक पाटील, राजपुरी जिल्हा सरचिटणीस विनोद पाटील, तालुका समन्वयक किशोर माळी, कार्याध्यक्ष किशोर पाटील, तालुका उपाध्यक्ष पवन पाटील, समाधान पाटील, राष्ट्रवादीचे युवा नेते राजेश करांडे, विद्यार्थी तालुकाध्यक्ष राकेश सोनार, राहुल चौधरी, धनराज पालक, समीर तडवी, विजय भोई, भरत भोई, छत्रपती फाउंडेशन संचालक गिरीश पाटील, तात्या कोळी, यशवंत अडकमोल, युवराज भास्कर पाटील, कैलास अडकमोल पटेल, ुभम विटवे चंद्रकांत कोळी, मुस्तुफा तडवी आदींसह तालुक्यासह शहरातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

