Dailyhunt
सलग दुसऱ्या दिवशी सोने स्वस्त.. आता प्रति १० ग्रॅमसाठी किती रुपये मोजावे लागणार?

सलग दुसऱ्या दिवशी सोने स्वस्त.. आता प्रति १० ग्रॅमसाठी किती रुपये मोजावे लागणार?

ळगाव लाईव्ह न्यूज । ७ एप्रिल २०२६ । महिनाभराहून अधिक काळ उलटून गेला तरी इराण, अमेरिका आणि इस्रायलमधील संघर्ष अद्याप थांबलेला नाही. या सतत सुरू असलेल्या तणावाचा परिणाम केवळ राजकीय पातळीवरच नव्हे, तर जागतिक अर्थव्यवस्था आणि बाजारपेठांवरही स्पष्टपणे दिसून येत आहे.

विशेषतः कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे बाजारात अस्थिरता वाढली आहे. Gold Silver Rate Today

दरम्यान, या परिस्थितीचा परिणाम सोनं आणि चांदीसारख्या मौल्यवान धातूंवर देखील झाला आहे. अलीकडच्या काळात या धातूंच्या किमतींमध्ये सातत्याने चढ-उतार सुरू असून सध्या त्यात घसरणीचा कल दिसून येत आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. यामुळे लग्नसराईसाठी सोन्याचे दागिने बनविणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज मंगळवारी सकाळी बाजार उघडल्यावर २४ कॅरेट सोन्याच्या दरात ८२० रुपयाची घसरण झाली. यामुळे १० ग्रॅम सोन्याचा दर १,४९,८४० रुपयावर पोहोचला आहे. तर ८ ग्रॅमच्या दरात ६५६ रुपयाची घसरण होऊन तो १,१९,८७२ रुपयावर पोहोचला आहे. २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा ७५० रुपयांनी घसरून १,३७,३५० रुपयावर पोहोचला. तसेच १८ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा ६१० रुपयांनी घसरून १,१२,३८० रुपयावर पोहोचला. उच्चांकाच्या तुलनेत सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत.

दुसरीकडे चांदी दरात मात्र स्थिरता दिसून येत आहे. आज मंगळवारी सकाळी बाजार उघडल्यानंतर दरात कोणतीच वाढ अथवा घट न झाल्याने चांदीचे दर २,५०,००० रुपये प्रति किलो इतका आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Jalgaon Live