Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीने घेतली उसळी ! जाणून घ्या आजचे ताजे दर

सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीने घेतली उसळी ! जाणून घ्या आजचे ताजे दर

ळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑगस्ट २०२६ । सणासुदीच्या तोंडावर आणि महिन्याच्या सुरुवातीला मागील दोन दिवसांत सोने-चांदीच्या दरात काहीशी घसरण पाहायला मिळाली होती. मात्र, आज सराफा बाजार उघडताच सोने आणि चांदीच्या किमतीत पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे.

GoodReturns च्या माहितीनुसार, आज ५ ऑगस्ट रोजी सकाळी सराफा बाजार उघडताच 24 कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल 1750 रुपयाची वाढ झालीय. तर २२ कॅरेट सोन्याचा दर १६०० रुपयांनी तर १८ कॅरेट सोन्याचा दर १३१० रुपये प्रति तोळ्याने वाढला आहे.सोन्यासोबतच चांदी दरातही मोठी वाढ झाली. आज चांदीचा एक किलोचा दर ५००० रुपयांनी वाढला. या वाढीमुळे ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे.

आजचे सोन्याचे दर
24 कॅरेट (10 ग्रॅम) : ₹1,45,750
22 कॅरेट (10 ग्रॅम) : ₹1,33,600
18 कॅरेट (10 ग्रॅम) : ₹1,09,310

चांदीही महागली

एक किलो चांदीच्या दरात ₹5,000 ची वाढ झाली असून, 1 किलो चांदीचा भाव ₹2,40,000 इतका आहे. सणासुदीच्या खरेदीच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ ग्राहकांसाठी चिंतेची बाब ठरत आहे.

सणासुदीच्या काळात सोने-चांदीच्या दरात चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता असल्याने खरेदीपूर्वी स्थानिक सराफा बाजारातील ताजे दर तपासूनच व्यवहार करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Jalgaon Live