जळगाव लाईव्ह न्यूज । १६ सप्टेंबर २०२१ । गेल्या अनेक वर्षापासून चाळीसगावकरांचे स्वप्न असलेल्या अश्वारुढ पुतळ्याचे आगमन चाळीसगावात दिनांक 26 सप्टेंबर रोजी होणार आहे.
नगरपालिकेच्या माध्यमातून शिवछत्रपतींच्या स्मारकाचे काम अंतिम टप्प्यामध्ये आहे. दरम्यान शिवछत्रपतींचा पुतळा आणण्याच्या हालचाली गतिमान झाल्या असल्याचे नगरसेवक घृष्णेश्वर पाटील यांनी जळगाव लाईव्हशी बोलताना सांगितले. तसेच शिवपुतळ्याच्या आगमनानंतर आमदार, खासदार, नगराध्यक्ष, नगरसेवक आदींच्या बैठकीमधून पुढील दिशा ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर चाळीसगावकरांचे स्वप्न लवकरच पूर्णत्वास येणार असल्याने उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

