जळगाव लाईव्ह न्यूज । अमेरिका-इस्रायलचं इराणशी युद्ध सुरू असताना सोन्या-चांदीचे भाव बरेच खाली घसरले होते. मात्र या युध्दविरामाच्या घोषणेनंतर सराफ बाजारात सोन्यासह चांदी दरात मोठी उसळी दिसून आली.
मात्र, आज पुन्हा या दरात घसरण झाली. आज गुरुवारी सकाळी बाजार उघडताच सोन्याच्या दरात चांगलीच घसरण झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
सोन्याचे दर घसरले
आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे २,३४० रुपयांनी घसरले आहेत. यामुळे आता सोन्याचा दर १,५१,४८० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर १,८७२ रुपयांनी घसरून १,२१,१८४ रुपयावर पोहोचले. तसेच आज २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे २,१५० रुपयांनी घसरून १,३८,८५० रुपये झाले आहेत. तर १८ कॅरेट सोन्याचे दर १,७६० रुपयांनी घसरून १,३६,६१० रुपये झाले आहेत.
आज सोन्यापाठोपाठ चांदी दरातही मोठी घसरण झाली आहे. चांदी दरात ५००० रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे चांदीचा एक किलोचा दर २,५५,००० रुपयावर पोहोचला आहे.
दरम्यान, बुधवारी जळगावच्या सुवर्णबाजारपेठेत सोन्याच्या दरात तब्बल ४ हजार रुपयांची वाढ झाली असून जीएसटीसह सोन्याचा दर १ लाख ५६ हजार ५६० रुपयांवर पोहोचला आहे. तर चांदीच्या दरात तब्बल ११ हजार रुपयांनी वाढ होत चांदीचा दर २ लाख ५४ हजार ४१० रुपयांवर गेला आहे. सराफ व्यावसायिकांच्या मते, सध्या जरी युद्धविराम लागू असला तरी पूर्णपणे युद्ध थांबण्याची अधिकृत घोषणा झाल्यास सोने आणि चांदीच्या दरात आणखी विक्रमी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे मत सोने तज्ञ यानी व्यक्त केले आहे.

