Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
युनायटेड इंडिया इन्शुरन्समध्ये मोठी पदभरती; पदवीधरांना सरकारी नोकरीची संधी

युनायटेड इंडिया इन्शुरन्समध्ये मोठी पदभरती; पदवीधरांना सरकारी नोकरीची संधी

ळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमध्ये (UIIC) विविध पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

या भरतीअंतर्गत एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (स्केल-I) पदाच्या एकूण 225 जागा भरल्या जाणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत 28 सप्टेंबर 2026 आहे.

रिक्त पदांचा तपशील :

या भरतीमध्ये एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (स्केल-I) जनरलिस्ट पदासाठी 200 जागा, तर एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (स्केल-I) हिंदी ऑफिसर पदासाठी 25 जागा उपलब्ध आहेत.

शैक्षणिक पात्रता :

जनरलिस्ट पदासाठी उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना किमान 60 टक्के गुण, तर SC/ST/PWD उमेदवारांना 55 टक्के गुण आवश्यक आहेत.

हिंदी ऑफिसर पदासाठी इंग्रजी विषयासह हिंदी विषयातील पदव्युत्तर पदवी आवश्यक असून, खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 60 टक्के, तर SC/ST/PWD उमेदवारांसाठी 55 टक्के गुणांची अट आहे.

वयोमर्यादा :

30 जून 2026 रोजी उमेदवाराचे वय 21 ते 30 वर्षे असावे. SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे, तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षांची वयोमर्यादा सवलत देण्यात आली आहे.

अर्ज शुल्क :

General/OBC/EWS उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 1,000 रुपये, तर SC/ST/ExSM/महिला उमेदवारांसाठी 250 रुपये शुल्क आहे.

निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतात नोकरीची संधी मिळणार आहे. भरती प्रक्रियेत पूर्व परीक्षा (Tier-I) 22 ऑक्टोबर 2026 रोजी, तर मुख्य परीक्षा (Tier-II) 30 नोव्हेंबर 2026 रोजी होणार आहे.

पात्र उमेदवारांनी अंतिम मुदतीपूर्वी ऑनलाइन अर्ज करावा. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 सप्टेंबर 2026 आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Jalgaon Live