जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑक्टोबर २०२१। युवासेनेच्या ११ व्या वर्धापन दिवसानिमित्त जळगाव शहरातील ५०० हुन अधिक व्यापारी, युवा उद्योजक, डॉक्टर व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या बांधवांना महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या प्रमुख निर्णयांची माहिती शिवसैनिक विराज कावडीया, अमित जगताप यांनी समक्ष भेटून दिली.
यावेळी त्यांचे सरकारविषयी मत व अपेक्षाही जाणून घेतल्या.
सरकार करीत असलेले कार्य व विविध योजनांची माहिती जास्तीत जास्त लोकपर्यंत पोहचावी व त्यांना लाभ व्हावा हा या उपक्रमा मागचा उद्देश आहे. भेटींचा सविस्तर माहिती अहवाल शिवसेनाप्रमुख पक्ष प्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख तथा मंत्री आदित्य ठाकरे, युवासेना सचिव वरुण सरदेसाई व संपर्क प्रमुख संजय सावंत यांना देण्यात येणार आहे. १७ ऑक्टोबर २०१० साली मुंबई येथील शिवाजी पार्क येथे शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात हिंदूहृद्य सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत व आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात युवासेना स्थापन करण्यात आली होती. मागील ११ वर्षापासून युवासेना देशभरात शिक्षण, रोजगार व आरोग्य या क्षेत्रात सतत लक्षणीय कार्य करीत आहे.
उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपमहानगर प्रमुख प्रशांत सुरळकर, प्रसिद्धी प्रमुख उमेश चौधरी, शिवसैनिक विराज कावडीया, अमित जगताप, प्रीतम शिंदे, संदीप सूर्यवंशी, भूषण सोनवणे, पियुष गांधी, स्वप्नील परदेशी, विशाल वाणी, अंकित कासार, संकेत कापसे, तेजस दुसाने, यश सपकाळे, यशश्री वाघ, कविता पवार, वैष्णवी खैरनार, उमाकांत जाधव, पूनम राजपुत, राजेश वारके आदींनी परिश्रम घेतले.

