Wednesday, 04 Dec, 3.10 pm JustRightCinema

होम
'३६ गुण' या मराठी सिनेमाची पहिली झलक

दिग्दर्शक समित कक्कड यांनी आजवर हुप्पा हुय्या, आयना का बायना, हाफ तिकीट, आश्चर्यचकित सारखे वेगळ्या धाटणीचे सिनेमे केले आहेत. आता त्यांचा '३६ गुण' नावाचा सिनेमा पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिनेमाच्या पोस्टची पहिली झलक नुकतीच प्रदर्शित करण्यात आली आहे. संतोष जुवेकर आणि पूर्वा पवार हे दोघे सिनेमात मध्यवर्ती भूमिकेत आहेत. आजच्या तरुण पिढीच्या नातेसंबंधांचा मानसिकतेवर आणि त्यांचा दृष्टिकोनातून भारतीय लग्न संस्थेवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. सिनेमाचे शूटिंग मुंबई, लंडन येथे झाले आहे. समीत कक्कड फिल्म्स आणि द प्रोडक्शन हेडक्वार्टर्स लि. प्रस्तुत सिनेमाचे लेखन हृषिकेश कोळी यांनी केले आहे.
Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: JustRightCinema
Top