Saturday, 30 Nov, 12.10 pm JustRightCinema

होम
अजय देवगण आणि रोहित शेट्टी करणार 'गोलमाल ५' सिनेमा

सूर्यवंशी सिनेमानंतर दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि अजय देवगण 'गोलमाल ५' सिनेमा करणार आहेत. गोलमाल सिनेमाच्या चार सिरीज आतापर्यंत रिलीज झाल्या आहेत. ज्याला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिलेली आहे. गोलमाल ४ हा हॉरर कॉमेडी सिनेमा होता. गोलमाल ५ सिनेमाला पुढील वर्षी सुरुवात होईल. अजय देवगण, अर्शद वारसी, तुषार कपूर, श्रेयस तळपदे, कुणाल खेमु आतापर्यंत सर्व गोलमाल सिरीज मध्ये होते पण कदाचित कथानकाच्या मागणीनुसार यावेळी वेगळे कलाकार या सिनेमात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुख्य भूमिकेत कोणती अभिनेत्री असेन हे मात्र पुढील वर्षी ठरवण्यात येईल. रोहित शेट्टी सध्या सूर्यवंशी सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात अक्षय कुमार, कतरिना कैफ मुख्य भूमिकेत असून सिनेमा २०२० मध्ये रिलीज होणार आहे. तर अजय देवगणचा 'तानाजी : द अनसंग वॉरियर' सिनेमा जानेवारी २०२० मध्ये रिलीज होणार आहे.
Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: JustRightCinema
Top