Wednesday, 04 Dec, 10.10 am JustRightCinema

होम
'बिबट्या' येतोय

बिबट्याचा शहरी, ग्रामीण भागातील वावर आता काही दुर्मिळ गोष्ट राहिलेली नाही. यासंबंधीच्या बातम्या आपण रोज बघतो. या पार्श्वभूमीवर स्वयंभू प्रोडक्शन निर्मित आणि चंद्रशेखर सांडवे दिग्दर्शित 'बिबट्या' नावाचा सिनेमा घेवून येत आहे. या सिनेमाचे शूटिंग नुकतेच लातूर जिल्ह्यातील शिवणी कोतल या ग्रामीण भागात पूर्ण झाले. या सिनेमात महेश कोकाटे यांनी खलनायकाची भूमिका साकारली आहे. त्याचबरोबर विजय पाटकर, प्रवीण तरडे, प्रमोद पवार, अशोक कुलकर्णी, सचिन गवळी, प्रियंका कासले, शुभम पाटील, सुप्रिया पाटील या कलाकारांनी काम केले आहे. बिबट्या सिनेमाची कथा पटकथा चंद्रशेखर सांडवे यांची असून संवाद कमलेश खंडाळे यांचे आहे. बिबट्या हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: JustRightCinema
Top