Thursday, 28 Nov, 5.10 pm JustRightCinema

होम
दबंग ३ सिनेमात 'मुन्ना बदनाम हुवा' गाण्यावर सलमान सोबत थिरकणार प्रभुदेवा

दबंग ३ सिनेमातील यु करके, हुड हुड दबंग हे दोन गाणे आतापर्यंत रिलीज झाले आहेत. पण सिनेमाच्या ट्रेलरमध्ये मुन्ना बदनाम हुवा हे गाण देखील दाखवण्यात आले आहे. त्यामुळे चुलबुल पांडेच हे गाण कधी प्रदर्शित होणार याची उत्सुकता आता प्रेक्षकांना लागलेली आहे. आता दिग्दर्शक प्रभुदेवा देखील सलमान सोबत मुन्ना बदनाम हुवा या गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. सुरवातीला या गाण्यावर सलमान सोबत वरिना हुसैन असणार हे फायनल झाले होते पण आता या गाण्यात प्रभुदेवा देखील असणार आहे. हे गाण अधिक चांगलं होण्यासाठी सलमानने प्रभुदेवाला गाण्यात सामील व्हायला सांगितले आणि प्रभुदेवाने ते लगेचच मान्य केले. 'वॉन्टेड' सिनेमात सलमान सोबत प्रभुदेवा, गोविंदा आणि अनिल कपूर 'मेरा ही जलवा' गाण्यात थिरकताना दिसले होते. पण आता सलमान आणि प्रभुदेवाची जोडी पुन्हा एकदा 'मुन्ना बदनाम हुवा' गाण्यावर थिरकताना दिसणार आहे.

सलमान आणि प्रभुदेवा या गाण्यात फंकी ब्लॅक जॅकेट मध्ये दिसणार आहे. दबंग ३ सिनेमात किच्चा सुदीप, सलमान खान, सोनाक्षी सिन्हा, सई मांजरेकर, अरबाज खान असणार आहेत. हा सिनेमा २० डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: JustRightCinema
Top