Tuesday, 03 Dec, 11.10 am JustRightCinema

होम
क्रिकेटर मिताली राजच्या बायोपिकमध्ये तापसी मुख्य भूमिकेत : शाब्बाश मिथू असे असेल सिनेमाचे नाव

आजवर बॉलिवुडमध्ये अनेक स्पोर्ट बायोपिक सिनेमे बनले आहेत. मेरी कोम, एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी, मिल्खा सिंग या सिनेमानी प्रेक्षकांची मन तर जिंकलीच पण बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. आता महिला क्रिकेट कप्तान मिताली राज हिच्या आयुष्यावर आधारित बायोपिक बनत आहे. या सिनेमात तापसी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आज मिताली राज हीचा वाढदिवस असल्याने या सिनेमाची घोषणा करण्यात आलेली आहे. या सिनेमाचे टायटल 'शब्बाश मिथू' असे असणार आहे. सिनेमाचे दिग्दर्शन राहुल ढोलकिया करणार आहे ज्यांनी रईस सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. याचबरोबर स्पोर्ट बायोपिक मध्ये आगामी रणवीर सिंगचा 83, परिणिती चोप्राचा सायना नेहवाल बायोपिक आणि शाहिद कपूरचा जर्सी या सिनेमाचा समावेश असणारं आहे.
Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: JustRightCinema
Top