Wednesday, 27 Nov, 12.10 pm JustRightCinema

होम
लेखक विश्वास पाटील यांनी 'पानिपत' सिनेमाचे कथानक चोरल्याचा केला आरोप

'पानिपत' सिनेमाचा ट्रेलर रिलीज होताच अर्जुन कपूरने साकारलेल्या सदाशिव पेशवे या भूमिकेवर युझर्सनी त्याला ट्रोल केले. तो या भूमिकेसाठी योग्य नाही असे सल्लेही देण्यात आले पण आता एक नवीन वाद सुरू झाला आहे. लेखक विश्वास पाटील यांनी लिहिलेल्या 'पानिपत' कांदबरीतून सिनेमाचं कथानक घेतले असल्याचा आरोप पाटील यांनी निर्मात्यांवर केलेला आहे. याबाबत पाटील यांनी दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, निर्माते रोहित शेलाटकर, रिलायन्स एंटरटेनमेंट यांच्यावर मुंबई उच्च न्यायालयात कथानक चोरी केल्याची याचिका दाखल केली असून नुकसान भरपाई म्हणून सात कोटींची मागणी देखील केलेली आहे. निर्माते रोहित शेलाटकर यांच्या वतीने सांगण्यात आले आहे की, सिनेमाचे लेखक म्हणून विश्वास पाटील यांचे नाव देण्यात येईल आणि हा सिनेमा त्यांच्या लिहलेल्या कादंबरीवर आधारित असल्याचे सांगण्यात येईल परंतु प्रत्यक्षात तसे घडलेले नाही.
Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: JustRightCinema
Top