Monday, 02 Dec, 6.10 pm JustRightCinema

होम
मिरा नायर दिग्दर्शित 'अ सुटेबल बॉय' सिरिजचा फर्स्ट लूक

ईशान खट्टर आणि तब्बू पहिल्यांदा एकत्रित स्क्रीन शेयर करत आहेत. मिरा नायर दिग्दर्शित 'अ सुटेबल बॉय' सिरीजमध्ये ते काम करत आहे. त्याचा फर्स्ट लूक ईशानने इंस्टाग्राम अकाऊंटवर शेयर केला आहे. चार मोठ्या कुटुंबाभोवती बहुरंगी भारतीय संस्कृतीची पार्श्वभूमी असलेले कथानक यामध्ये दाखवण्यात आलेलं आहे. विशेषतः यामध्ये मुक्त भारत आणि भारतातील लोकांच्या बहुरंगी भावना असे कथानक या सिरिजचे असणार आहे. ईशान यामध्ये मान नावाच्या मुलाची व्यक्तिरेखा साकारत आहे. कॉलेजमध्ये जाणारा, ज्याला वडिलांचं राजकारण आवडत नाही, तो फक्त त्याच आयुष्य मजेत जगतो. तब्बू यामध्ये सईदा बाईची भूमिका करत आहे. जी एक वारांगना आहे. शेयर केलेल्या फर्स्ट लूकमध्ये तब्बू एका लाकडी झोक्यावर बसलेली आहे तर ईशान तब्बुकडे एकटक बघत आहे. या टीव्ही सिरीजचे शुटिंग लखनऊ येथे सप्टेंबर २०१९ मध्ये सुरू झाले होते. यामध्ये तान्या मनिक्तला हा नवीन चेहरा ईशानच्या अपोझिट असणार आहे. जून २०२० मध्ये ही सिरीज बघायला मिळणार आहे.
Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: JustRightCinema
Top
// // // // $find_pos = strpos(SERVER_PROTOCOL, "https"); $comUrlSeg = ($find_pos !== false ? "s" : ""); ?>