Tuesday, 26 Nov, 2.10 am JustRightCinema

होम
राम मंदिरावरील सिनेमाची निर्मिती करणार कंगना राणावत

देशात एखादी मोठी घटना घडली की त्या घटनेवर आधारित लगेच सिनेमे बनवले जातात. आजवर अनेक अभिनेत्रींनी अभिनयाबरोबरच निर्माती म्हणून देखील सिनेमे निर्मित केले आहे. अनुष्का शर्मा, दीपिका पदुकोण या पाठोपाठ आता कंगना राणावत देखील निर्माती म्हणून सिनेमा करत आहे. कंगनाने 'मनकर्निका' सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. आता ती राम मंदिरावरील सिनेमातून निर्मिती क्षेत्रात देखील पदार्पण करत आहे. या आगामी सिनेमाचे नाव 'अपराजित आयोध्या' असे आहे. के व्ही विजेंद्र प्रसाद हे प्रसिद्ध लेखक या सिनेमाच्या पटकथेवर काम करत आहेत. या सिनेमात एका नास्तिक तरुणाचा आस्तिकतेपर्यंतचा प्रवास दाखवला जाणार आहे. याआधी प्रसाद यांनी बाहुबली सिनेमाची पटकथा लिहिली होती. पुढील वर्षी या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होईल. आयोध्येतील राम मंदिर हा प्रश्न लहानपणापासून मी बघत आले आहे. म्हणून या सिनेमाची निर्मिती करण्याचा निर्णय मी घेतला असे कंगना राणावत हिने सांगितले.
Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: JustRightCinema
Top