Monday, 25 Nov, 4.10 pm JustRightCinema

होम
शाहरुख खानची निर्मिती असणाऱ्या सिनेमात अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत

शाहरुख खान लवकरच राजकुमार हिरानी यांच्या बरोबर सिनेमा करणार असल्याची चर्चा असली तरी शाहरुख खान निर्मित करत असलेल्या सिनेमाची घोषणा त्याने ट्विटरवरून केली आहे. बॉब बिस्वास असे सिनेमाचे नाव असून अभिषेक बच्चन या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शाहरुखच्या रेड चिली एंटरटेनमेंट प्रोडक्शन अंतर्गत असणाऱ्या या सिनेमाचे दिग्दर्शन दिव्या अन्नपूर्णा घोष करणार आहे. अभिषेक यामध्ये कॉट्रॅक्ट किलरच्या भूमिकेत असून विद्या बालनच्या कहाणी सिनेमा सारखा हा एक सस्पेन्स थ्रिलर सिनेमा असणार आहे. शाहरुख बरोबर अभिषेकचा हा तिसरा सिनेमा असणार आहे. त्यांनी कभी अलविदा ना केहना, हॅपी न्यू इअर सिनेमात एकत्र काम केले होते. बॉब बिस्वास हा सिनेमा पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: JustRightCinema
Top