Friday, 08 Nov, 1.10 pm JustRightCinema

होम
सोशल मीडियातून 'केबीसी'वर होतेय चौफेर टीका

सोनी वाहिनीवर सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता प्रसारित होणाऱ्या 'केबीसी' (कौन ब करोडपती) कार्यक्रमात बुधवारच्या एपिसोडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा 'शिवाजी' असा एकेरी उल्लेख केल्याने केबीसीवर सोशल मीडियाच्या माध्यमातून चौफेर टीका केली जात आहे. सोनी वाहिनी सोबतच अमिताभ बच्चन यांच्यावर ही टीका केली जात असून #Boycott_KBC_SonyTv हा हॅशटॅग वापरला जात आहे. भारतात ट्विटरवर नवव्या क्रमांकावर हा ट्रेंड हॅशटॅग होता. जो ९ हजाराहून जास्त युझर्सनी वापरला आहे. गुजरातच्या शाहेदा चंद्रण या हॉट सीटवर बसलेल्या होत्या त्यांना 'यापैकी कोणता शासक मुघल सम्राट औरंगजेबचा समकालीन होता?' असा प्रश्न विचारला होता. चार पर्यायामध्ये महाराणा प्रताप, राणा संगा, महाराजा रणजित सिंघ आणि शिवाजी असे पर्याय देण्यात आले होते. या एकेरी उल्लेखामुळे अनेक लोकांनी त्या एपिसोड नंतर सोशल मीडियावर राग व्यक्त केलेला आहे. या प्रकाराबद्दल अमिताभ बच्चन, सोनी वाहिनीचे मालक, दिग्दर्शक, निर्माता यांच्या विरुध्द देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी पुण्यात संभाजी ब्रिगेडने केली आहे.

युझर्सच्या काही प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे

१) स्त्रियांवर अत्याचार करणारा सम्राट आणि महाराजांचा एकेरी उल्लेख

२)सोनी पाहू नका

३)मराठा योद्धाचा अपमान

४)KBC पाहणार नाही

५)हिंदूंच्या भावनांची किंमत करा

६)संतापजनक

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: JustRightCinema
Top