Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
गाव-भूगोल-जात-आरोग्य

गाव-भूगोल-जात-आरोग्य

हात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200 व्या जयंतीदिनी साधना प्रकाशनाकडून 'बाभळीच्या बाया : झरी-जामणी तालुक्यात' हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या लेखिका वनश्री वनकर या समाजकार्य क्षेत्रातील व्यावसायिक आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातील झरी-जामणी तालुक्यात एका कंपनीतर्फे सीएसआरच्या माध्यमातून काम करत असतानाचे त्यांचे अनुभव साधना साप्ताहिकात 'झरी-जामणी तालुक्यात' या लेखमालेतून प्रसिद्ध झाले, त्यात काही लेखांची भर घालून त्यांचे पुस्तक साधना प्रकाशनाकडून आले आहे.या पुस्तकात 18 लेख आहेत: सुरवंट, माझ्या बायांची पहिली मीटिंग, आमचा आपला दिवस, मेरा नकाब कहाँ है, प्रिया संध्या, फॉर्म नंबर 17, भविष्याचा प्रिंट आऊट, मनीषा : दिल से जिंकलेली, आशावादी सपना, गीताताई, पदर, ये लढाई लंबी है, गाव-भूगोल- जात-आरोग्य, सरपंचीणबाई, श्यामल, गृहपाठ, आमची लांची, संविधान दिन.हे संपूर्ण पुस्तक अभिनेत्री गौरी देशपांडे यांच्या आवाजात, ऑडिओ बुक स्वरूपात Storytel वर 8 ऑगस्ट 2026 पासून उपलब्ध होणार आहे. वार्षिक वर्गणी भरून 'स्टोरीटेल'चे सभासद होता येते. 'स्टोरीटेल'चे सभासद असलेल्या वाचक-श्रोत्यांना ते संपूर्ण सहा तासांचे पुस्तक सलग येथे ऐकता येईल.2 ऑगस्टपासून प्रत्येक शनिवारी व रविवारी या पुस्तकातील एक भाग kartavyasadhana.in या डिजिटल पोर्टलवर प्रसिद्ध होईल, ते सर्व भाग विनामूल्य ऐकता येतील. या मालिकेतील सर्व भाग एकापाठोपाठ एक येथे ऐकता येतील.आज त्याचा चौदावा भाग प्रसिद्ध करत आहोत.
प्रकरण तेरावे - गाव-भूगोल-जात-आरोग्य (16 मिनिटांचा ऑडिओ)
जातिव्यवस्थेचा आरोग्यावर होणारा परिणाम महिलांना समजावून सांगण्यासाठी प्रशिक्षणात गावाचा नकाशा काढण्याचा उपक्रम घेण्यात आला. महिलांनी आपल्या गावातील घरे, रस्ते, पाणी, शाळा, दवाखाने आणि वस्त्यांसोबतच गरोदर माता, कुपोषित बालके, अ‍ॅनिमियाग्रस्त माता, सिकलसेलचे रुग्ण, शौचालयाचा वापर आणि दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे यांचीही नकाशावर नोंद केली. त्यानंतर विविध जातीय-सामाजिक प्रवर्गांची घरे वेगवेगळ्या रंगांनी दाखवली. नकाशे पूर्ण होत गेले तसतशी गावाची सामाजिक रचना स्पष्ट दिसू लागली. काही प्रवर्गांची घरे गावाच्या मध्यवर्ती भागात असून तिथे चांगले रस्ते, पाणी, स्वच्छता आणि इतर सुविधा होत्या; तर अनुसूचित जाती-जमाती आणि मुस्लिम समाजाच्या वस्त्या गावाच्या कडेला होत्या. त्यांच्याजवळच कचरा, स्मशानभूमी आणि गोदरी असल्याने अस्वच्छता, आजार आणि दारिद्र्यही अधिक होते. त्यामुळे अपुरे पोषण, कमी शारीरिक व बौद्धिक विकास, शिक्षणातील अडथळे आणि रोजगाराच्या मर्यादा यांचे चक्र पिढ्यान्पिढ्या सुरू राहते, हे महिलांच्या लक्षात आले. या उपक्रमातून आरोग्य हा केवळ वैयक्तिक प्रश्न नसून सामाजिक आणि आर्थिक विषमतेशी जोडलेला आहे, याची जाणीव झाली. झरी-जामणीयवतमाळसीएसआरcsr वनश्री वनकरगौरी देशपांडेजातीव्यवस्था जातआरोग्यगावगाडा जातिनिहाय ग्रामरचनाजात आणि आरोग्य
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Kartavya Sadhana