Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे सौ सुनिताताई गडाख यांच्या हस्ते लोकार्पण.

अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे सौ सुनिताताई गडाख यांच्या हस्ते लोकार्पण.

नेवासा तालुक्यातील सर्वसामान्य जनतेसाठी विविध योजना राबविण्याचे काम मोठ्या वेगात सुरू असून आरोग्य सेवेबाबतच्या विविध योजनांचा गोरगरीब रुग्णांना फायदा होईल यासाठी विशेष प्रयत्न केले जात असून नेवासा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांनी रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानुन काम करावे .असे प्रतिपादन नेवासा पंचायत समितीच्या माजी सभापती सौ सुनिताताई गडाख यांनी केले आहे.

महाराष्ट्राचे जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली अर्थ व बांधकाम खात्याचे सभापती सुनिलभाऊ गडाख , चांदा जिल्हा परिषद गटाच्या सदस्या सौ सविताताई अडसुरे यांच्या विशेष प्रयत्नातुन चांदा प्राथमिक आरोग्य केंद्राला अत्याधुनिक रूग्णवाहिका मिळाली त्या रुग्णवाहिकेच्या लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी सौ गडाख बोलत होत्या . चांदा प्राथमिक आरोग्य केंद्रा अर्तगत सोळा गावे येतात . त्यामुळे या आरोग्य केंद्रासाठी अत्याधुनिक रूग्णवाहिकेची अत्यंत आवश्यकता होती . नामदार गडाख , तसेच सभापती सुनिल गडाख , जिप सदस्या सौ सविताताई अडसुरे यांच्या प्रयत्नामुळे ती आज पुर्ण झाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली यावेळी माजी सभापती कारभारी जावळे , तालुका वैद्यकिय अधिकारी अभिराज सुर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले . चांदा आरोग्य केंद्रासाठी दोन एकर जागा दान करणाऱ्या कै मोहन रामजी दहातोंडे यांच्या प्रतिमेचे पुजन करून त्यांच्या कुटुंबातील लाटे दाम्पत्याचा सन्मान सौ गडाख यांच्या हस्ते करण्यात आला . या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्या सौ सविताताई अडसुरे , पंचायत समिती सदस्या सौ पार्वतीबाई जावळे ,माजी पस सदस्य अनिलराव अडसुरे , गावच्या सरपंच सौ ज्योती जावळे, ग्रा सदस्य बाळासाहेब दहातोंडे , पोपट दहातोंडे , रावसाहेब दहातोंडे , माजी सरपंच संजय भगत , रवी जावळे , अमीत रासने, सादिक शेख , सोमनाथ दहातोंडे , देवीदास पासलकर , मच्छिंद्र दहातोंडे पत्रकार राजेंद्र लाटे , सौ लाटे राहुल दहातोंडे , दिपक जावळे चंद्रकांत जावळे ,, भारत दहातोंडे , दिलीप बोरूडे , महेश दहातोंडे ,बाळासाहेब डागवाले , केंद्राचे प्रमुख डॉ .रजनिकांत पुंड आदि सह ग्रामस्थ उपस्थित होते सुत्रसंचालन पत्रकार अरुण सोनकर यांनी तर आभार सतिष गाढवे यांनी मानले


कोवीड १९च्या काळात रुग्णांची अविरत सेवा करणाऱ्या डॉक्टर्स , आरोग्य केंद्राचे कर्मचारी यांचे हात जोडून शतशः आभार मानत आपल्या सर्वांमुळे आपण कोवीडला थोपवु शकलो अशी भावना नेवासा पंचायत समितीच्या माजी सभापती सौ सुनिताताई गडाख यांनी व्यक्त केली .

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: KhabarNama