Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बीडमध्ये NEET पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपी प्रा. पी. व्ही. कुलकर्णी यांच्या अनधिकृत इमारतीवर चालला पालिकेचा हातोडा

बीडमध्ये NEET पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपी प्रा. पी. व्ही. कुलकर्णी यांच्या अनधिकृत इमारतीवर चालला पालिकेचा हातोडा

बीड

नीट-यूजी पेपर लीक प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आणि निवृत्त रसायनशास्त्र प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी याच्याविरोधात बीडमध्ये प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. सीबीआयने अटक केलेल्या कुलकर्णी याच्या शाहूनगर भागातील बेकायदेशीर चार मजली इमारतीवर बीड नगरपालिकेने पाडकामाची कारवाई सुरू केली आहे.

नगरपालिकेने याआधीच या अवैध बांधकामासंदर्भात कायदेशीर नोटीस बजावली होती. या नोटीसची मुदत संपताच पालिका प्रशासनाने जेसीबी यंत्रांच्या साहाय्याने ही इमारत पाडण्यास सुरुवात केली. या कारवाईदरम्यान परिसरात मोठ्या प्रमाणावर धूळ आणि ढिगारा साचल्याचे पाहायला मिळाले.

राष्ट्रीय परीक्षा एजन्सी म्हणजेच एनटीएसाठी काम करणाऱ्या कुलकर्णी याने नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका लीक करण्यात मुख्य भूमिका बजावल्याचा गंभीर आरोप आहे. सीबीआयच्या अटकेनंतर त्याचे हे बेकायदेशीर बांधकाम प्रशासनाच्या रडारवर आले होते. दरम्यान, भविष्यात कोणतेही बांधकाम करताना प्रशासनाची रीतसर परवानगी घेणे बंधनकारक राहील, असे पालिकेने स्पष्ट केले आहे. राज्य सरकारच्या अवैध बांधकामांविरोधी धोरणाचा भाग असलेल्या या धडक कारवाईचे स्थानिक नागरिकांकडून मोठे स्वागत केले जात आहे.


Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: KhabarNama