Dailyhunt
धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान; 'कुणाला खाज असेल तर दरबारात यावे'

धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान; 'कुणाला खाज असेल तर दरबारात यावे'

नागपूर

नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर सध्या बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांची २६ ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत श्री राम कथा सुरू आहे. या कार्यक्रमादरम्यान धीरेंद्र शास्त्री यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख श्याम मानव यांना अत्यंत आक्रमक भाषेत खुलं आव्हान दिलं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये शास्त्री म्हणाले की, मी सध्या नागपुरातच असून ज्या कुणाला शंका किंवा 'खाज' असेल त्यांनी प्रत्यक्ष दरबारात येऊन खात्री करावी. त्यांनी स्पष्ट केले की हा मंच आणि हा प्रदेश तुमचाच आहे, त्यामुळे मी इथे असतानाच समोर यावे.

श्याम मानव यांनी यापूर्वी धीरेंद्र शास्त्रींना एक आव्हान दिले होते. जर त्यांनी नियंत्रित परिस्थितीत १० निवडक व्यक्तींची नावे, त्यांच्या वडिलांचे नाव, वय आणि मोबाईल नंबर अचूक सांगितले, तर त्यांना ८० लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल, असे मानव यांनी जाहीर केले होते. या आव्हानाला प्रत्युत्तर देताना शास्त्रींनी त्यांना रामकथेच्या ठिकाणी येऊन आध्यात्मिक शक्तींची चाचणी घेण्याचे आमंत्रण दिले आहे. ३० एप्रिल रोजी हा कार्यक्रम संपणार असून, आपण निघून गेल्यावर 'बाबा पळून गेले' असे म्हणू नका, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. या वादामुळे श्रद्धा, अध्यात्म आणि अंधश्रद्धा निर्मूलन या विषयांवरील चर्चा पुन्हा एकदा देशभर रंगू लागली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: KhabarNama