Saturday, 25 Sep, 10.49 am खबरनामा

होम
डॉ.जयदेवी राजेकर : एक प्रशंसनीय कोरोना योद्धा

माहेर लातूर,सासर दिल्ली तरीही कोसो दूर वैद्यकीय अधिकारी पदावर डॉ.जयदेवी राजेकर या युवतीने कोरोना योद्धा म्हणून पिंपळगाव पिसा प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वर्षे दिला लढा.

श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य अधिकारी पदावर गेल्या दोन वर्षांपासून कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ.जयदेवी राजेकर या युवतीने कोरोना योद्धा म्हणून दोन वर्षे लढा दिला आहे.माहेर लातूर जिल्ह्यातील उदगीर साडेतीनशे किलोमीटर असताना बीएएमएस पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी राज्य शासनाची करार पद्धतीने वैद्यकीय अधिकारी पदावर नोकरी स्विकारली.तीही गावापासून कोसो दूर असलेल्या नगर जिल्ह्यातील पिंपळगाव पिसा सारख्या ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात. या ठिकाणी त्यांच्या समवेत औरंगाबाद येथील डॉ.पूजा देशमुख ही युवती रुजू झाली.या दोघींची चांगली गट्टी जमली.मात्र त्यांना रुग्णांची सेवा करण्याची संधी मिळाली व सहा महिन्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला.कोरोना काळात त्यांची रुग्णांची सेवा करण्याची धडपड सुरू झाली.अशात डॉ.पूजा देशमुख यांचा विवाह झाल्यानंतर त्यांनी नोकरी सोडली.त्यांनंतर डॉ.जयदेवी राजेकर यांच्या एकटीवर आरोग्य केंद्राची जबाबदारी पडली.डॉ.जयदेवी यांचे कुटुंब उदगीर येथे स्थायीक असले तरी ते मुळ हरियाणातील असल्याने त्यांचा विवाह मागील वर्षी दिल्ली व हरियाणा सिमेवरील बहादुरगढ येथील प्रा.संदीप चौधरी यांच्याशी झाला.हा विवाह कोरोना काळात झाल्याने डॉ.जयदेवी यांनी केवळ आठवडाभर सुट्टी घेतली व रुग्णांची सेवा करण्यासाठी सज्ज झाल्या.अगोदरच माहेर साडेतीनशे किलोमीटर दूर व आता सासरही दिड हजार किलोमीटर दूरवर असताना कोरोना लढ्यातून पळ न काढता त्यांनी रुग्णांची सेवा करण्याचा निर्णय घेतला.त्यासाठी त्यांना सासरच्या मंडळींची चांगली साथ मिळाली.आपल्या सुनेने आता महाराष्ट्र सरकारची नोकरी सोडून आपल्या सासरी दवाखाना सुरू करावा अशी त्यांची अपेक्षा होती.मात्र डॉ.जयदेवी यांनी त्यांच्या इच्छेनुसार निर्णय घ्यावा अशी सासरच्या मंडळींनी सूट दिली.गेल्या सात आठ महिन्यांपासून या प्राथमिक आरोग्य केंद्रात रुजू झालेल्या पारनेर तालुक्यातील वडझीरे येथील डॉ.तबसूम पठाण यांची त्यांना कोरोना युद्धाचचे लढाईत चांगली साथ मिळाली.कोरोनाचे काळात डॉ.जयदेवी राजेकर व डॉ.तबसूम पठाण या युवतींबरोबरच जिल्हा व राज्यात अनेक तरुण बीएएमएस डॉक्टर रुग्णांची सेवा करत होते.आता मात्र सरकारने गरज सरो व वैद्य मरो या जून्या म्हणी प्रमाणे एमबीबीएस डॉक्टर मिळाल्यानंतर या सर्वांना कार्यमुक्त केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: KhabarNama
Top