महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या महत्त्वाच्या बैठकीला दांडी मारून दिल्ली गाठल्यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
अचानक झालेल्या या दिल्ली दौऱ्यामुळे महायुती सरकारमध्ये सर्व काही आलबेल नसल्याच्या आणि शिंदे नाराज असल्याच्या अटकळी बांधल्या जात होत्या. परंतु, एकनाथ शिंदे यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. इतर राज्यांतील पक्षसंघटनेच्या बैठका आणि पक्षाचे नाव तसेच धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईच्या पार्श्वभूमीवर वकिलांशी चर्चा करण्यासाठी हा दौरा आधीच निश्चित होता, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. भारतीय जनता पक्षाने देखील कोणत्याही अंतर्गत नाराजीचा इन्कार केला आहे.

