Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
गडचिरोलीत १४ आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांना जमिनीचे भूखंड वाटप; मुला सायकल व शैक्षणिक साहित्याचे वितरण

गडचिरोलीत १४ आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांना जमिनीचे भूखंड वाटप; मुला सायकल व शैक्षणिक साहित्याचे वितरण

गडचिरोली

हाराष्ट्रातील नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात आता नक्षलवाद अंतिम टप्प्यात पोहोचला असून शांतता प्रस्थापित होत आहे. राज्य सरकारने २००५ पासून सुरू केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे आणि पोलीस प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे अनेक जहाल माओवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे.

या पूर्व माओवाद्यांना पुन्हा एकदा समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांना सन्मानजनक आयुष्य जगण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी 'प्रोजेक्ट संजीवनी' हा विशेष उपक्रम राबवला जात आहे.

याच योजनेचा एक भाग म्हणून १ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात १४ आत्मसमर्पण केलेल्या माओवादी सदस्यांना राहण्यासाठी जमिनीच्या भूखंडांचे (प्लॉट) वाटप करण्यात आले. यासोबतच इतर पात्र सरेंडर माओवाद्यांना त्यांच्या पुनर्वसनासाठी आर्थिक मदतीचे चेक सुपूर्द करण्यात आले. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल ८१९ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.

जिल्हा प्रशासन आणि गडचिरोली पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने राबवल्या जाणाऱ्या या अभियानांतर्गत आतापर्यंत १७४ जमिनीचे भूखंड मंजूर करण्यात आले आहेत, ज्यापैकी १५३ भूखंडांचे प्रत्यक्ष वाटप पूर्ण झाले आहे. केवळ आर्थिक मदत आणि जमिनीचे वाटप करून न थांबता, या सदस्यांच्या पुढील पिढीला उत्तम शिक्षण मिळावे यासाठी त्यांच्या मुलांना सायकली आणि अभ्यासाचे साहित्य देण्यात आले. तसेच, त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी पात्र सदस्यांना ड्रायव्हिंग लायसन्सचे वितरणही करण्यात आले.


Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: KhabarNama