Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
हॉकी संघाच्या जर्सीचा रंग 'भगवा' करण्यावरून नवीन पटनाईक आक्रमक; म्हणाले, 'निळा रंग राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक'

हॉकी संघाच्या जर्सीचा रंग 'भगवा' करण्यावरून नवीन पटनाईक आक्रमक; म्हणाले, 'निळा रंग राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक'

नवी दिल्ली

भारतीय राष्ट्रीय हॉकी संघाच्या जर्सीचा पारंपरिक निळा रंग बदलून तो भगवा करण्यात आल्याच्या वृत्तावरून बीजू जनता दल (बीजेडी) अध्यक्ष आणि ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

हा प्रकार म्हणजे राष्ट्रीय क्रीडा प्रतीकांचे राजकीयकरण करण्याचा आणि देशाचा क्रीडा वारसा पुसून टाकण्याचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. 'X' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून मत मांडताना पटनाईक यांनी स्पष्ट केले की, भारतीय हॉकी संघाची निळ्या रंगाची जर्सी हा केवळ एक रंग नसून ती देशाच्या क्रीडा परंपरेशी जोडलेली भावना आहे. पुरुष आणि महिला दोन्ही हॉकी संघांनी याच निळ्या जर्सीत ऑलिम्पिक पदके जिंकून जगभरात राष्ट्रध्वज उंचावला आहे. आपल्या राष्ट्रध्वजातील अशोक चक्रातून आलेला हा निळा रंग प्रत्येक भारतीयाचा असून तो राष्ट्रीय अभिमानाची ओळख आहे. जेव्हा भारतीय हॉकी संघांना प्रायोजक मिळणे कठीण झाले होते, तेव्हा ओडिशा हे राष्ट्रीय पुरुष आणि महिला संघांचे पहिले व एकमेव प्रायोजक बनले होते, याची आठवणही त्यांनी करून दिली. ४१ वर्षांनंतर पुरुष संघाने ऑलिम्पिक पदक जिंकले तेव्हा या योगदानाचा प्रत्येक ओडिया नागरिकाला सार्थ अभिमान वाटला होता, असे सांगत त्यांनी या बदलावर ताशेरे ओढले.


Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: KhabarNama