Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
क्रिकेटर युझवेंद्र चहलची राजकारणात धमाकेदार एन्ट्री

क्रिकेटर युझवेंद्र चहलची राजकारणात धमाकेदार एन्ट्री

भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या राष्ट्रीय टीममध्ये मिळाली मोठी जबाबदारी

नवी दिल्ली

भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी आणि दिग्गज लेग स्पिनर युझवेंद्र चहल याने आता क्रिकेटच्या मैदानानंतर राजकारणाच्या आखाड्यात पाऊल टाकले असून भारतीय जनता पक्षामध्ये (भाजप) अधिकृत प्रवेश केला आहे.

पक्षाने चहलवर मोठा विश्वास दाखवत त्याची भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये विशेष निमंत्रित सदस्य म्हणून निवड केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या निर्देशानुसार ओबीसी मोर्चाच्या राष्ट्रीय टीममध्ये संघटनात्मक बळकटीसाठी मोठ्या प्रमाणावर नव्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत, ज्या अंतर्गत चहलला ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या अधिकृत नियुक्तीपूर्वी युझवेंद्र चहल याने ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार अमर पाल मौर्य यांची सदिच्छा भेट घेऊन सविस्तर चर्चा केली होती. चहलच्या या राजकीय प्रवेशामुळे क्रीडा आणि राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली असून तरुण वर्गामध्ये पक्षाची ताकद वाढण्यास मदत होणार असल्याचे बोलले जात आहे.


Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: KhabarNama