Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने च्या प्रयत्नामुळे गणेश जगदाळे यांना राष्ट्रीय स्तरावरील 'अॅस्पी' पुरस्कार-मा.आ.चंद्रशेखर घुले पाटील

कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने च्या प्रयत्नामुळे गणेश जगदाळे यांना राष्ट्रीय स्तरावरील 'अॅस्पी' पुरस्कार-मा.आ.चंद्रशेखर घुले पाटील

कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने चे लाभ शेतकऱ्यांना भेटू लागले- मा.आ.चंद्रशेखर घुले पाटील

केव्हीके, दहिगाव-ने करत आहे लोकनेते मारुतराव घुले पाटील यांचे स्वप्न साकार- मा.आ.चंद्रशेखर घुले पाटील

केव्हीके, दहिगाव-ने यांच्या प्रयत्नामुळे गणेश जगदाळे यांना मिळाला एक लाख रु. रकमेचा राष्ट्रीय स्तरावरील 'अॅस्पी' पुरस्कार जाहीर -मा.आ.चंद्रशेखर घुले पाटील


दहिगाव-ने

'अॅस्पी' ॲग्रीकल्चरल रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन, मालाड, मुंबई यांच्या वतीने गणेश कडूबाळ जगदाळे, रा.सुलतानपूर (मठाचीवाडी), ता.शेवगाव, जि.अहिल्यानगर यांना सोयाबीन पिकासाठी राष्ट्रीय स्तरावरील 'अॅस्पी' एल.एम.पटेल फार्मर ऑफ द इयर अवॉर्ड २०२४ साठी निवड झाली. त्याबद्दल अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मा. आ. चंद्रशेखर घुले पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

हा पुरस्कार १९९७ पासून दरवर्षी उत्कृष्ट, नाविन्यपूर्ण आणि प्रगतशील शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानासाठी सन्मानित करण्यासाठी प्रदान केला जातो. श्री जगदाळे यांना जाहीर पुरस्काराची नामांकन प्रक्रिया खरीप २०२४ या वर्षी सुरु झाली. 'अॅस्पी' संस्थेंतर्गत संपूर्ण भारत देशातून सोयाबीन उत्पादक इच्छुक शेतकऱ्यांकडून पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात आले. त्यानुसार कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने, ता.शेवगाव च्या शास्त्रज्ञांनी कार्यक्षेत्रातील सोयाबीन उत्पादक शेतकरी गणेश जगदाळे, रा.सुलतानपूर (मठाचीवाडी), ता.शेवगाव यांचे पुरस्कारासाठी नामांकन पाठवली. प्रथम टप्प्यामध्ये नामांकन मिळाले. दुसऱ्या टप्प्यामध्ये सोयाबीन पिकासंबंधित संपूर्ण माहिती जसे शेताची नांगरणी, पिकाची पेरणी खुरपणी, फवारणी व खत नियोजन तसेच काढणी, ग्रेडिंग व पेकिंग संबंधित संपूर्ण प्रक्रियेचा ३० मिनिटांचा व्हिडिओ 'अॅस्पी' संस्थेस पाठविण्यात आला. त्यानुसार संस्थेने पाठविलेल्या व्हिडिओ ची वरिष्ठ शास्त्रज्ञांकडून परीक्षण केले. परीक्षण झाल्यानंतर संपूर्ण भारतातून गणेश जगदाळे यांची सोयाबीन तंत्रज्ञान पद्धत उत्कृष्ट वाटली. त्यामध्ये एकरी २० क्विंटल सोयाबीन चे उत्पादन घेतले. ही संपूर्ण प्रक्रिया विविध टप्पांमध्ये पार पडली. या पुरस्कार अंतर्गत शेतकऱ्यांचे ज्ञान, शेती करण्याची पद्धत तपासण्यात आली. याकामी श्री.जगदाळे यांना केव्हीके चे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ.श्यामसुंदर कौशिक यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभले. या पुरस्काराचे सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र व एक लाख रुपये असे स्वरूप आहे. मालाड, मुंबई येथे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर २०२६ मध्ये राष्ट्रीय पातळीवर विशेष कार्यक्रमामध्ये हा पुरस्कार वितरीत करण्यात येईल. गणेश जगदाळे यांना वेगवेगळ्या संस्थांनी याआधी देखील पुरस्कार देऊन गौरवले आहे.

श्री.जगदाळे यांनी सांगितले की, मी सोयाबीन नंतर ऊस पिकाची लागवड करतो. सोयाबीन नंतर लागवड केलेल्या ऊसाचे मला ६० टन प्रति एकर उत्पादन सहज मिळते. शेवटी मी इतर शेतकऱ्यांना असे आवाहन करतो कि सोयाबीन नंतर ऊसाचे उत्पादन चांगले मिळते व जमिनीची सुपीकता देखील टिकून राहते.

या पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.आ.डॉ.नरेंद्र घुले पाटील, मा. आ. पांडुरंग अभंग, देसाई आबा देशमुख, डॉ. क्षितिज घुले पाटील व सर्व संचालक मंडळ तसेच सचिव अनिल शेवाळे साहेब, सहसचिव श्री रवींद्र मोटे, डॉ.श्यामसुंदर कौशिक केव्हीके चे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ, सर्व शास्त्रज्ञ व कर्मचारी तसेच सुलतानपूर (मठाचीवाडी) चे सरपंच सतिष धोंडे, पुलिस पाटील आबासाहेब वाघ, सोसायटी चे उपाध्यक्ष सोमनाथ सामृत, जगदाळे शिवाजी, ढिसले आप्पासाहेब, भाऊसाहेब जिवडे, पंचकृशीतील शेतकऱ्यांनी व मित्र परिवाराने अभिनंदन केले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: KhabarNama