Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
महाराष्ट्र एफडीएची थेट मुंबई उच्च न्यायालयात कारवाई; बार असोसिएशनकडून कॅन्टीन अन् कॉफी सेवा तात्पुरती बंद

महाराष्ट्र एफडीएची थेट मुंबई उच्च न्यायालयात कारवाई; बार असोसिएशनकडून कॅन्टीन अन् कॉफी सेवा तात्पुरती बंद

मुंबई

वी मुंबईतील एका हॉटेलच्या परवाना निलंबनाबाबत उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने एफडीएला सर्व सरकारी आणि निमसरकारी कॅन्टीनच्या पाहणीचे निर्देश दिले होते. या निर्देशांचे पालन करत महाराष्ट्र एफडीएच्या पथकाने मुंबई उच्च न्यायालयाच्या कॅन्टीनची पाहणी केली.

या तपासणीदरम्यान अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता आणि अन्न सुरक्षा मानकांची कसून चौकशी करण्यात आली तसेच संपूर्ण कारवाईचे चित्रीकरणही करण्यात आले. एफडीएच्या या पाहणीनंतर बॉम्बे बार असोसिएशनने खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या परिसरातील कॅन्टीन आणि कॉफी सेवा पुढील सूचनेपर्यंत तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. एफडीएकडून कोणताही प्रतिकूल आदेश किंवा नोटीस मिळालेली नसतानाही असोसिएशनने स्वतःहून हा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट केले आहे. एफडीएला या पाहणीचा सविस्तर अहवाल ३१ जुलै २०२६ पर्यंत न्यायालयात सादर करायचा आहे.


Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: KhabarNama