Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
महाराष्ट्रात भीषण दुष्काळ; आयपीएल २०२७ चे सामने दुसऱ्या राज्यात किंवा भारताबाहेर हलवण्याची शक्यता?

महाराष्ट्रात भीषण दुष्काळ; आयपीएल २०२७ चे सामने दुसऱ्या राज्यात किंवा भारताबाहेर हलवण्याची शक्यता?

मुंबई

महाराष्ट्रात यंदा पावसाची तीव्र तूट आणि अत्यंत गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे त्याचा थेट परिणाम आगामी आयपीएल २०२७ च्या आयोजनावर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यातील जवळपास २६५ तालुके आधीच दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले असून, त्यात आणखी १८ तालुक्यांचा समावेश केला जाण्याची शक्यता आहे. तीव्र पाणीटंचाई आणि शेतीचा प्रश्न गंभीर बनल्याने शेतकरी, मजूर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा फटका बसला आहे. या बिकट परिस्थितीशी सामना करण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून विविध उपाययोजना राबवल्या जात असून केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकही सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. अशा परिस्थितीत मैदानावरील पाणीपुरवठा आणि सामन्यांच्या आयोजनाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आयपीएलचे सामने अन्य भारतीय राज्यांत किंवा अगदी देशाबाहेर हलवले जाण्याची चर्चा सुरू आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: KhabarNama