Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मुंबईतील आरे कॉलनीमध्ये तणाव! अनेक वर्षांचा जुना दर्गा मुंबई महानगरपालिकेकडून जमीनदोस्त

मुंबईतील आरे कॉलनीमध्ये तणाव! अनेक वर्षांचा जुना दर्गा मुंबई महानगरपालिकेकडून जमीनदोस्त

मुंबई

मुंबईतील आरे कॉलनी परिसरातील एका दशकाहून अधिक जुना असलेला हजरत सय्यद बरकत अली शाह पीर बाबा दर्गा मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) जमीनदोस्त केला आहे. हा दर्गा सरकारी जमिनीवर बेकायदेशीरपणे उभारण्यात आल्याचे सांगत पालिकेने ही धडक कारवाई केली.

विशेष म्हणजे, २०१७ मध्येही पालिकेने या दर्ग्यावर तोडकामाची कारवाई केली होती, मात्र त्यानंतर तिथे पुन्हा बांधकाम करण्यात आले होते. बीएमसीने या संदर्भात वारंवार नोटिसा बजावूनही अतिक्रमण न हटवल्यामुळे अखेर आज मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही वास्तू पाडण्यात आली.

या कारवाईनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून एआयएमआयएमचे प्रवक्ते वारिस पठाण यांनी पालिकेच्या या भूमिकेवर तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे. मुंबईत अशी ४०० हून अधिक अनधिकृत धार्मिक स्थळे असताना केवळ मुस्लिम प्रार्थनास्थळांनाच लक्ष्य का केले जात आहे, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. दुसरीकडे, या कारवाईचे काही घटकांकडून स्वागत होत असून आरेसारख्या संवेदनशील आणि पर्यावरणीयदृष्ट्या महत्त्वाच्या हरित पट्ट्यामध्ये बेकायदेशीर बांधकामे हटवणे गरजेचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तर काही नागरिकांनी न्यायालयाने अंतिम निर्णय देण्यापूर्वीच पालिकेने ही घाईघाईने कारवाई केल्याचा आरोप केला आहे. वांद्रे येथील अशाच एका कारवाईनंतर आता आरेमधील या तोडकामामुळे मुंबईतील बेकायदेशीर धार्मिक बांधकामांविरुद्ध बीएमसीची मोहीम अधिक तीव्र झाल्याचे स्पष्ट होत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: KhabarNama