Dailyhunt
नाशिकमध्ये विकासाच्या नावाखाली निसर्गाचा बळी; गंगापूर रोडवरील पुरातन वारसा वृक्षांची कत्तल

नाशिकमध्ये विकासाच्या नावाखाली निसर्गाचा बळी; गंगापूर रोडवरील पुरातन वारसा वृक्षांची कत्तल

नाशिक

नाशिकच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या आणि पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्या शतकानुशतके जुन्या वारसा वृक्षांवर रविवारी कुऱ्हाड चालवण्यात आली. गंगापूर रोड परिसरातील हे भव्य वृक्ष केवळ काही सेकंदांत यंत्रांच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले.

विशेष म्हणजे, नागरिकांचा किंवा पर्यावरणप्रेमींचा विरोध होऊ नये यासाठी नियोजितपणे रविवारच्या सुट्टीचा दिवस निवडून ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप 'वात फाउंडेशन'ने केला आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, शतकभर जपलेला हा निसर्गाचा वारसा अवघ्या काही क्षणांत नष्ट झाल्यामुळे नाशिककरांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. विकासाच्या नावाखाली शहराची फुफ्फुसे मानले जाणारे हे पूर्ण वाढलेले वृक्ष तोडणे ही कधीही भरून न येणारी हानी असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या घटनेचा निषेध करत नागरिकांनी प्रशासनाला जबाबदार धरले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आता जोर धरत आहे.


Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: KhabarNama